News Flash

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार मुंबईतील रुग्णालयात दाखल

दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी या विषयी माहिती दिली आहे.

९८ वर्षांचे दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी सकाळी मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

९८ वर्षांचे दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील नॉन कोविड वॉर्डमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास  होता तसेच त्यांचे रुटिन चेकअप करायचे असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिलीप कुमार यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानो यांनी दिली आहे.

यापूर्वी मे महिन्यात दिलीप कुमार यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण नेहमीच्या काही चाचण्या करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सायरा बानो यांनी सांगितले होते. ‘आम्ही रुग्णालयात केवळ रुटिन चेकअप करण्यासाठी आलो आहोत’ असे सायरा बानो यांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 10:26 am

Web Title: dilip kumar admitted to mumbai hospital avb 95
Next Stories
1 मनी हाइस्ट ५ : ‘हे एक मोठ युद्ध असेल..’, बर्लिन अर्थात पेद्रो अलोन्सोने उलगडला सस्पेन्स
2 मनोरंजन क्षेत्रातील संघटनांशी आज मुख्यमंत्र्यांचा संवाद
3 यामी गौतम विवाहबद्ध
Just Now!
X