News Flash

“स्वत:ची बॅगही पकडू शकत नाही”; एकता कपूर ट्रोल

"वेब सीरिजमध्ये अश्लीलता दाखवते"

निर्माती एकता कपूर मालिकांसोबत वेब सिरीजमधील तिच्या बोल्ड विषयांमुळे अनेकदा चर्चेत येते. नुकतच एकताला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं आहे. विमान तळावरील एकताचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलाय. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी एकताला ट्रोल केलं आहे.

या व्हिडीओत एकता गाडीतून उतरताना दिसतेय. तिने काळ्या रंगाचं शर्ट परिधान केलंय. ती गाडीतून उतरते आणि चेहऱ्यावर आणखी एक मास्क लावताना दिसते. एकताची बॅग यावेळी  तिच्या एका सहकाऱ्याने पकडल्याचं दिसतंय. ती मास्क लावून पुढे चालू लागते. मात्र तिची बॅग या सहकाऱ्यानेच पकडल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी एकतावर चिडले आहेत. ती साधी स्वत:ची बॅग पकडू शकत नाही का? असा सवाल उपस्थित करत एकताला ट्रोल करण्यात आलंय. यावेळी एकताला तिच्या वेब सीरिजवरून देखील ट्रोल करण्यात आलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

एक युजर एकताच्या या व्हिडीओवर म्हणाला , “ती साधी स्वत:ची बॅगही पकडू शकत नाही. किती अॅटीट्यूड आहे. ती हुशार आहे. मालिकांमध्ये ती आदर्श सून कशी हे दाखवते तर वेब सीजमध्ये ती अश्लीलता दाखवते.” असं म्हणत युजरने निशाणा साधला आहेत.

तर दुसरा युजर म्हणाला, ” वेब सीरिजमध्ये सर्वांना चारित्र्यहीन दाखवते. मोकळेपणाने जगणं म्हणजे चारित्र्यहीन होणं असा नसतो.”

“प्रियांका चोप्राची बहीण असल्याने मला बॉलिवूडमध्ये काम मिळालं नाही”, मीरा चोप्राचा खुलासा

एकता कपूर तिच्या ‘हिस स्टोरी’ या वेब सीरिजमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. एकता कपूरवर या वेब सीरिडचं पोस्टर चोरीचा आरोप करण्यात आला. त्यानंतर एकताने माफीदेखील मागितली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 3:28 pm

Web Title: ekta kapoor troll for not holding her own bag kpw 89
Next Stories
1 सुझेन आणि सोहमचे प्रेम प्रकरण येणार शुभ्रासमोर
2 ‘नागडे राजकारणी…नागडं सरकार…नागडा देश’, आस्ताद काळेची पोस्ट चर्चेत
3 किरण खेर यांची करोनाबाधितांसाठी मदत; खासदार स्थानिक विकास निधीतून दिले १ कोटी!
Just Now!
X