28 September 2020

News Flash

एकता कपूर झाली आई

तीन वर्षांपूर्वी एकता कपूरचा भाऊ तुषार कपूर देखील सरोगसीद्वारे बाबा झाला होता.

संग्रहित छायाचित्र

बालाजी टेलिफिल्म्सची सर्वेसर्वा एकता कपूर ही आई झाली आहे. एकता कपूरने सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला असून लवकरच चिमुकल्याचे एकताच्या घरी आगमन होणार आहे.

तीन वर्षांपूर्वी एकता कपूरचा भाऊ तुषार कपूर हा देखील लग्न न करताच बाबा झाला होता. सरोगसी आणि आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून तो वडील झाला होता. आता एकता कपूरनेही याबाबतीत भावाचे अनुकरण केले आहे. एकता कपूरही आता लग्न न करताच आई झाली आहे. २७ जानेवारी रोजी सरोगसीद्वारे एकता कपूर आई झाली आहे. बाळ आणि सुखरुप असून लवकरच कपूर कुटुंबाच्या घरी बाळाचे आगमन होईल, असे सूत्रांनी सांगितले. या वृत्तासंदर्भात एकता कपूर किंवा कपूर कुटुंबातील सदस्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. एकता कपूर ही अभिनेते जितेंद्र यांची कन्या आहे.

बॉलीवूड आणि सरोगसी
बॉलीवूडमध्ये एकल पालकत्व हा विषय नवा नाही. यापूर्वी तुषार कपूर, करण जोहर या मंडळींनीही सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला होता. तर आमिर खान- किरण राव, शाहरुख खान – गौरी यांनी देखील सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 9:38 am

Web Title: ekta kapoor welcomes first child via surrogacy its boy
Next Stories
1 कपिल देवच्या बायोपिकमध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी
2 आसूडमध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार ‘शेतकऱ्यांचा शिवाजी’
3 …म्हणून सेटवर वेळेत येऊ लागला कपिल शर्मा
Just Now!
X