प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवलेली ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका म्हणजे अगणित राजकीय ताकद मिळवण्यासाठी सुरू झालेला सत्तेचा खेळ होय. जॉर्ज आर. आर. मार्टनी यांच्या ‘साँग ऑफ आइस अ‍ॅण्ड फायर’ या कादंबरीवरून या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. २०११ साली सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. आता या मालिकेचं देसी व्हर्जन निर्माती एकता कपूर प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचं म्हटलं जात आहे.

नवनव्या मालिका आणि विविध धाटणीचे कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी एकता कपूर सतत प्रयत्न करत असते. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेच्या कथानकाचं आधार घेत एका नव्या मालिकेची निर्मिती करणार आहे. ‘टेलीचक्कर’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार मूळ मालिकेच्या कथेवर ही नवी मालिका पूर्णपणे आधारित नसून त्याच्याशी साधर्म्य कथानक असेल. अर्थात मूळ ‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्ये जे इन्टिमेट सीन भरपूर प्रमाणात दाखवलेत जातात तेही एकताच्या या मालिकेत पाहायला मिळणार आहेत.

वाचा : ‘भाभीजी घर पर है’ मालिकेतील कलाकारांचं मानधन ऐकून तुम्हीही व्हाल थक्क! 

या देसी व्हर्जनबाबत निर्मात्यांकडून सध्या बरीत गुप्तता पाळण्यात येत असून यामध्ये कोणकोणते कलाकार कोणत्या भूमिका साकारणार याची माहिती अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे. एकता कपूरच्या ‘अल्ट बालाजी’अंतर्गत ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येईल. त्यामुळे आता प्रचंड वैविध्य असलेल्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ कथेचं देसी व्हर्जन पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरेल.