असीम निष्ठा आणि अतुलनीय शौर्याने मराठेशाहीच्या इतिहासात आपला अमीट ठसा उमटविणारे व्यक्तिमत्व म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. वयाच्या १६ व्या वर्षी शिवाजी महाराजांनी आपल्या निष्ठावान सहकाऱ्यांच्या मदतीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत ‘स्वराज्यासाठी लढण्याची आणि मरण्याची’ शपथ घेतली, याच मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक म्हणजे तानाजी मालुसरे. या सुभेदार तानाजी मालुसरे यांची तडफदार व्यक्तिरेखा ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात अभिनेता अजय पूरकर रंगविणार आहेत. येत्या १५ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भूमिकेतलं वेगळेपण जपत रंगभूमी, चित्रपट, मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा साकारणारे अजय पूरकर यांच्यासाठी ही भूमिका आव्हानात्मक होती. ‘फर्जद’ मधील ‘मोत्याजी मामा’ यांची भूमिका साकारल्यानंतर अत्यंत शूर आणि पराक्रमी अशा तानाजींच्या या भूमिकेसाठी वेगळेपण जपणं गरजेचं होतं.

dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट

फर्जंदच्या यशानंतर प्रेक्षकांना आमच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. मी साकारत असलेली ‘तानाजी’ ही व्यक्तिरेखा महत्त्वपूर्ण असल्याने या व्यक्तिरेखेसाठी मी चांगलीच मेहनत घेतली आहे. विशेष म्हणजे हा वेगळेपणा जपण्यासाठी सिंहगडावरील तानाजीच्या पुतळ्यावरून प्रेरित होऊन माझी वेशभूषा करण्यात आली आहे. तसेच भूमिका अधिक चांगली वठण्यासाठी तलवारबाजी, घोडेस्वारी यासारखी अभ्यासपूर्ण तयारी मी केली आहे. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी शब्दातून, अभिनायातून तसेच देहबोलीतून व्यक्त होणं गरजेच होतं त्यामुळे बारीक कंगोऱ्यांसह ही भूमिका उभी करण्याचा प्रयत्न मी केला आहे, असं अजयने सांगितलं.

दरम्यान, या चित्रपटामध्ये अभिनेता ‘अंकित मोहन शिवकाळातील शूर आणि विश्वासू सरदारांपैकी एक असणाऱ्या ‘येसाजी कंक’ यांची भूमिका साकारणार आहे. ‘येसाजी कंक’ यांना ‘शिवबाचा ढाण्या वाघ’ म्हणून ओळखलं जातं. मदमस्त हत्तीला ही आपल्या शौर्याने काही क्षणांत लोळवणाऱ्या येसाजी कंक यांचे स्वराज्यनिर्मितीत बहुमूल्य योगदान राहिले असल्याची महती इतिहासात वर्णलेली आहे.