09 August 2020

News Flash

ऑनस्क्रिन ‘भल्लालदेव’ची रिअल लाईफमधली ‘देवसेना’; पाहा साखरपुड्याचे फोटो

हैदराबादमध्ये हा साखरपुडा पार पडला असून याला निवडक लोक उपस्थित होते.

राणा डग्गुबत्ती, मिहिका बजाज

‘बाहुबली’ चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारणाऱ्या राणा डग्गुबतीला खऱ्या आयुष्यात ‘देवसेना’ भेटली आहे. लॉकडाउनमध्येच राणाने मिहिका बजाज हिच्याशी साखरपुडा केला. हैदराबादमध्ये हा साखरपुडा पार पडला असून याला निवडक लोक उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच राणाने मिहिकासोबतचा फोटो पोस्ट करत तिच्यासोबत लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. सध्या त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

साखरपुड्याला राणाने पांढरा शर्ट आणि मुंडू परिधान केला होता. तर मिहिकासुद्धा पारंपरिक वेशभूषेत पाहायला मिळाली. राणाचे वडील सुरेश बाबू यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, राणाचं लग्न हिवाळ्यात करण्यात येणार आहे. या लग्नाची तयारीसुद्धा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

कोण आहे मिहिका बजाज?

मिहीका बजाजची आई बंटी बजाज या दागिन्यांच्या व्यवसायातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्या भारतातील प्रसिद्ध वेडिंग डेकॉर प्लॅनरसुद्धा होत्या. मिहीकाने इंटेरिअर डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर ती लंडनला उच्च शिक्षणासाठी गेली. तिने मुंबईत इंटर्न डिझायनर म्हणूनही एक वर्ष काम केलं. २०१७ मध्ये मिहीकाने स्वत:ची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी स्थापित केली. ‘ड्यू ड्रॉप डिझाइन स्टुडिओ’ असं तिच्या कंपनीचं नाव आहे. कामानिमित्त मिहीका सतत हैदराबाद व मुंबई या शहरांमध्ये प्रवास करते. या दोन्ही शहरांबद्दल तिला विशेष प्रेम आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 12:35 pm

Web Title: first photos rana daggubati gets engaged to miheeka bajaj ssv 92
Next Stories
1 मराठी अभिनेत्रीचा पतीसोबत बोल्ड अवतार; फोटो होतोय व्हायरल
2 नोटाबंदीवर अनुराग कश्यपचा चित्रपट; अमृता सुभाष, उपेंद्र लिमये महत्त्वपूर्ण भूमिकेत
3 अनुष्काचा ‘पाताल लोक’ वादाच्या भोवऱ्यात; बजावली कायदेशीर नोटीस
Just Now!
X