ओटीटी प्लॅटफॉर्मचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत जात असताना लॉकडाउनदरम्यान अनेक कलाकार वेब विश्वाकडे आकर्षित झाले. आता वेब सीरिजमध्ये मोठमोठे बॉलिवूड कलाकारसुद्धा झळकू लागले आहेत. नुकतीच विवाहबद्ध झालेली अभिनेत्री गौहर खान लवकरच ‘तांडव’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यापूर्वी बोल्ड दृश्यांमुळे अनेक वेब सीरिजना नकार दिल्याचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला.
“फक्त प्रसिद्धीसाठी मी बोल्ड सीन करणार नाही याबाबत माझा निर्णय अगदी स्पष्ट आहे. मी जी भूमिका साकारतेय, त्याला पूर्ण न्याय देण्याची एक अभिनेत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. पण हो, माझ्या काही मर्यादा आहेत. फक्त एका शोचा किंवा वेब सीरिजचा भाग होण्यासाठी मी ती मर्यादा ओलांडणार नाही”, असं तिने स्पष्ट केलं. गेल्या दीड वर्षात अशा अनेक प्रोजेक्ट्सचे ऑफर्स नाकारल्याचंही तिने सांगितलं.
View this post on Instagram
आणखी वाचा- ‘मी न्यूड फोटोशूट केलं आहे’, वनिताने सांगताच आई म्हणाली…
“कलाकार म्हणून भूमिकेला पूर्ण न्याय देणं खूप महत्त्वाचं असतं. पण बोल्ड सीन करण्याबाबत मी कम्फर्टेबल नाही. त्यामुळे मी माझा वेगळा पर्याय निवडला आहे”,असं ती पुढे म्हणाली. गौहरने आतापर्यंत ‘रॉकेट सिंग : सेल्समन ऑफ द इअर’, ‘गेम’, ‘इशकजादे’, ‘बेगम जान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय.