सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकची चलती सुरु आहे. अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आलेल्या ‘संजू’ या चित्रपटाच्या यशानंतर बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा देखील समावेश आहे. आता अभिनेता हिमेश रेशमिया भारतीय जवानावर बायोपिक काढणार असल्याचे समोर आले आहे.
अभिनेता हिमेश रेशमिया बऱ्याच दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून दूर होता. आता तो चाहत्यांसाठी ४ चित्रपट घेऊन येत आहे. त्यातील एक चित्रपट भारतीय सैन्यदलातले जवान बिष्णू श्रेष्ठा यांच्या जीवनावर आधारित आहे. अलिकडेच हिमेशने या चित्रपटाचे हक्क विकत घेतले असल्याचे चित्रपट व्यापर विश्लेषक तरण आदर्शने ट्विटरद्वारे सांगितले आहे.
Himesh Reshammiya acquires rights of biopic on Bishnu Shrestha… An army officer who fought armed robbers in a train… Lead actor under finalisation… Also, Himesh will announce four new films *as an actor*… Includes the sequel of #TheXposé, titled #TheXposéReturns. pic.twitter.com/PoZZme4S2G
— taran adarsh (@taran_adarsh) March 31, 2019
या चित्रपटात २०१० साली बिष्णू यांनी धावत्या रेल्वेमध्ये दहशतवाद्यांशी मुकाबला करुन रेल्वेप्रवाशांची कशा प्रकारे सुटका केली हे दाखवण्यात येणार आहे. बिष्णू श्रेष्ठा यांच्या या मोलाच्या कामगिरीसाठी त्यांना भारत सरकारकडून शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. बिष्णू श्रेष्ठा यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची कथा लिहून पूर्ण होताच चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच चित्रपटाचे नाव आणि चित्रपटातील कलाकार यांची घोषणा अद्याप झालेली नाही.
या आधी हिमेश रेशमीया २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेरा सुरूर’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट २००७मधील ‘आप का सुरूर’ या चित्रपटचा रिमेक होता.