‘कच्चा लिंबू’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटानंतर उत्सुकता आहे ती प्रसाद ओक दिग्दर्शित हिरकरणी या चित्रपटाची. या चित्रपटाचं अत्यंत उत्कंठावर्धक असं मोशन पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसाद ओक आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त राजेश मापुसकर पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.

चित्रपटात कलाकार कोण आहेत हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. “प्रत्येक आई असतेच… हिरकणी” ही टॅगलाईनही आकर्षक आहे. मुलासाठी अतिशय मोठं धाडस केलेल्या आईची ऐतिहासिक गोष्ट चित्रपटात मांडण्यात आल्याचं आपल्याला मोशन पोस्टरवरून कळतं. गडाच्या बुरुजावर उभे असलेल्या छत्रपती शिवरायांपासून ते खांद्यावर बाळ घेऊन उभी असलेली हिरकणी आपल्याला पोस्टरमध्ये दिसते. चित्रपटाचं मोशन पोस्टर अतिशय उत्कंठावर्धक आहे.

Movie Review : असह्य ‘साहो’

इरादा एंटरटेन्मेंटच्या फाल्गुनी पटेल यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. लॉरेन्स डिसुझा सहनिर्माते आहेत. तर राजेश मापुसकर यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून जबाबदारी पेलली आहे.

येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.