‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यामुळे या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा मिळवली आहे. विशेष म्हणजे ‘विनोद करणं किंवा विनोदी अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे केवळ आमचं काम नाही तर तो आमचा ऑक्सिजन आहे’, असं म्हणत अभिनेता समीर चौगुलेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये रंगलेल्या मुलाखतीत समीर चौगुले यांनी त्यांच्या अभिनयासोबतच लिखाणाविषयीदेखील अनेक गोष्टींवर चर्चा केली. तसंच विशाखा सुभेदार आणि त्यांची एकमेकांसोबत असलेली मैत्री कशी आहे यावरदेखील त्यांनी भाष्य केलं.