28 January 2021

News Flash

मी घरातच सुरक्षित, अटक झालेली नाही-पूनम पांडे

पूनम पांडेने तिच्या इन्स्टाग्रावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे

पूनम पांडे म्हणते आहे की मला कुठे अटक झाली आहे? मी तर रात्रभर जागून तीन चित्रपट पाहिले. खूप मजा आली. मला अटक झाल्याच्या बातम्या येत आहेत असं मी ऐकलं. मला काल रात्रीपासून काही बातम्याही समोर येत आहेत आणि काही फोन कॉल्सही. पण मला अटक वगैरे झालेली नाही. मी घरातच आहे आणि सुरक्षित आहे असं तिने म्हटलं आहे. तिच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिने यासंदर्भातला एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओतच तिने आपण घरातच आहोत असं म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

Guys I heard I got arrested, While I was having a movie marathon last night.

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

काय आहे प्रकरण?

अभिनेत्री पूनम पांडेला अटक केल्याची बातमी पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली होती. पूनम पांडे आणि तिचा मित्र ड्राइव्हला गेले असल्याने तिला अटक करण्यात आली आणि तिची BMW कार जप्त करण्यात आली असं वृत्त पीटीआयने दिलं होतं. पूनम पांडे आणि तिचा मित्र सॅम अहमद यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या ५१ बी, २६९ आणि १८८ या कलमांन्वये कारवाई झाल्याचंही पीटीआयनं म्हटलं होतं.

मात्र यासंदर्भात आता अभिनेत्री पूनम पांडेनेच समोर येऊन स्पष्टीकरण दिलं आहे. मी रात्रभर तीन चित्रपट एकापाठोपाठ एक बघत होते. मला खूप मजा आली. मला अटक झाली आहे अशा बातम्या मला समजल्या तसंच रात्रीपासून मला फोनही येत होते. मात्र मला अटक झालेली नाही. मी माझ्या घरातच आहे आणि सुरक्षित आहे असं पूनम पांडेने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 6:05 pm

Web Title: i am not arrested safe in the home clarifies actress poonam pandey scj 81
टॅग Poonam Pandey
Next Stories
1 माजी पंतप्रधान मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल, अनुपम खेर म्हणाले…
2 शाहिदला येतीये ‘जर्सी’च्या सेटची आठवण; शेअर केला ‘खास’ फोटो
3 भारतात लॉकडाउन सुरु असताना सनी लिओनी पोहचली अमेरिकेत, ‘हे’ आहे कारण
Just Now!
X