News Flash

‘तू सुंदर दिसत नाहीस’, म्हणत अभिनेत्रीला दिग्दर्शकाने नाकारलं

'मी घराणेशाहीचीदेखील शिकार झाले आहे'

राधिका मदन

कलाविश्वामध्ये दिसण्यावरुन कलाकारांना मिळणारा दुजाभाव हा काही नवीन मुद्दा नाही. आजवर अनेक अभिनेत्रींना, अभिनेत्यांना त्यांच्या रंग-रुपावरुन ट्रोल करण्यात आलं आहे. इतकंच कशाला काही कलाकारांना कामापासूनही मुकावं लागलं आहे. यातच एका अभिनेत्रीने दिलेल्या मुलाखतीत तिला दुजाभावाचा अनुभव आल्याचं सांगितलं. सुंदर दिसत नसल्यामुळे एका दिग्दर्शकाने तिला काम नाकारलं होतं.

‘इंग्रेजी मीडियम’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री राधिका मदनला कलाविश्वात वर्णभेदाला सामोरं जावं लागलं. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत तिने तिचं अनुभव कथन केलं.

“एका दिग्दर्शकाने मला कास्टिंगसाठी बोलावलं होतं. त्यानुसार मी कास्टिंगसाठी गेले. त्यानंतर दिग्दर्शकाला माझा अभिनय आवडला. मात्र मी सुंदर दिसायला पाहिजे होती असं त्याचं म्हणणं होतं. हे फार मोठं प्रोडक्शन हाऊस होतं. परंतु सगळं फायनल झाल्यानंतर तू सुंदर दिसत नाहीस असं कारण सांगत मला रिजेक्ट केलं”, असं राधिकाने सांगितलं.

वाचा : हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याला करोनाचा संसर्ग; ट्विट करून दिली माहिती

पुढे ती म्हणते, “मी दिग्दर्शकांना सांगितलं की, मी मुंबईमधील मुलगी नाहीये आणि या कलाविश्वात माझा कोणी गॉडफादरही नाहीये. या कलाविश्वात मी घराणेशाहीचीही शिकार झाले आहे. एका चित्रपटात मी काम करणार होते. मात्र तो रोल एका अभिनेत्याच्या मुलीला करण्याची इच्छा होती. त्यामुळे ही भूमिका माझ्याकडून काढून घेण्यात आली होती”.

वाचा : १०० व्या नाट्य संमेलनावर करोनाचं सावट; तारखेत होणार बदल?

दरम्यान, राधिका मदन ‘अंग्रेजी मीडियम’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच अभिनेता इरफान खान स्क्रीन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसापासून बॉलिवूडपासून दूर गेलेला अभिनेता इरफान खान पडद्यावर झळकणार आहे. हा चित्रपट १३ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 11:19 am

Web Title: irrfan khan angrezi medium actress radhika madan interview after rejection ssj 93
Next Stories
1 ‘आता आणखी सहन होत नाही’ म्हणत अरमान मलिकने डिलीट केले इन्स्टाग्रामचे सर्व पोस्ट
2 विरुष्काची एकूण संपत्ती माहिती आहे का?
3 Video : सेल्फी घेणाऱ्या चाहतीवर भडकली करीना; म्हणाली…
Just Now!
X