19 September 2020

News Flash

तुमचे मनापासून आभार, इरफानची चाहत्यांसाठी भावनिक पोस्ट

न्यूरोएन्डोक्राईन कर्करोगावर उपचार घेत असलेला इरफान भारतात परतला आहे.

इरफान खान

लंडनमध्ये न्यूरोएन्डोक्राईन कर्करोगावर उपचार घेत असलेला अभिनेता इरफान खान भारतात परतला आहे. आजारपणावर मात करून भारतात परतलेल्या इरफाननं आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. या काळात तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी ज्या प्रार्थना केल्या त्यामुळे मी लवकर बरा होऊ शकलो असं म्हणत इरफाननं ट्विटरवर एक भावनिक पोस्ट शेअर करत सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.

‘जिंकण्याच्या प्रयत्नात कुठेतरी आपण स्वत:वर प्रेम करणं विसरून जातो. मात्र कठीण समयी आपल्याला त्याची जाणीव होते. मी माझ्या आयुष्याच्या या वळणावर थांबून मला मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे आणि प्रार्थनेमुळे मी लवकर बरा होऊ शकलो’ असं इरफान म्हणाला. इरफाननं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात इरफानला न्यूरोएन्डोक्राईन कर्करोग झाला होता. त्यानंतर तो लंडनमध्ये उपचारासाठी गेला. मार्च २०१९ मध्ये इरफान मुंबईत परतला. इरफानच्या तब्येतीत आता सुधारणा होत असून तो लवकरच हिंदी मिडिअमच्या सीक्वलला सुरूवात करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2019 1:45 pm

Web Title: irrfan khan has written a thank you note for his fans
Next Stories
1 ‘दबंग ३’चे शूटिंग सुरू होताच टायटल ट्रॅकचा व्हिडिओ लीक
2 जाणून घ्या, अक्षयच्या सुर्यवंशीच्या स्पेलिंगमध्ये का वापरलेत २ वेळा ‘O’
3 अनुराग कश्यपच्या चित्रपटातून कंगनाचा काढता पाय
Just Now!
X