News Flash

‘मिशन इम्पॉसिबल 7’मध्ये दिसणार प्रभास? दिग्दर्शक किस्टोफर यांनी केला खुलासा

‘मिशन इम्पॉसिबल 7’मध्ये प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात होते.

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास संपूर्ण देशात लोकप्रिय आहे. त्याचे साता समुद्रापार देखील चाहते आहे. बुधवारी सोशल मीडियावर ‘बाहुबली’ फेम प्रभास हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूजसोबत ‘मिशन इम्पॉसिबल ७’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. हा चित्रपट २०२२मध्ये प्रदर्शित होणार आहे. आता चित्रपटाचे दिग्दर्शक किस्टोफर मॅक्वेरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या प्रभास त्याचा आगामी चित्रपट ‘राधे श्याम’चे इटली येथे चित्रीकरण करत आहे. दरम्यान प्रभासने दिग्दर्शक किस्टोफर मॅक्वेरी यांची भेट घेतली असल्याचे म्हटले जात होते. एका चाहत्याने ट्वीटरद्वारे क्रिस्टोफर यांना प्रश्न विचारला की भारतात सोशल मीडियावर मिशन इम्पॉसिबल ७ या चित्रपटात प्रभास दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. खरच प्रभास चित्रपटात दिसणार आहे की नाही? यावर प्रतिक्रिया द्या.

आणखी वाचा : जेठालालच्या ‘गडा इलेक्ट्रॉनिक्स’ दुकानाचा कोण आहे मालक? जाणून घ्या

चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देत क्रिस्टोफर यांनी म्हटले की, ‘प्रभास हा अतिशय टॅलेंटेड अभिनेता आहे. पण आम्ही भेटलो नाही. इंटरनेटवर तुमचे स्वागत आहे.’

लवकरच प्रभास ‘आदिपुरुष’ आणि ‘सलार’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याचसोबत प्रभास नाग अश्विन दिग्दर्शित एका सिनेमात झळकणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असून अभिनेत्री दीपिका पादूकोणही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 11:09 am

Web Title: is prabhas part of mission impossible 7 director christopher maquarrie responds avb 95
Next Stories
1 Birthday Speaial: शाहरुख खानचा मुलगा अबरामने ‘या’ सिनेमातून केली आहे बॉलिवूडमध्ये एण्ट्री!
2 सुष्मिता सेनच्या लेकीने शेअर केला ग्लॅमरस फोटो; सोशल मीडियावर रिनी सेनचा फोटो व्हायरल
3 अंदमान वॅकेशनचे फोटोज लीक झाल्यानं भडकल्या आशा पारेख; ते आमचं खाजगी वॅकेशन होतं…
Just Now!
X