News Flash

‘लोकं उपाशी मरतायेत आणि…’, काजोलचा व्हिडीओ पाहून संतापले यूजर्स

सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी हे कायमच चर्चेत असतात. कधी त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांमुळे तर कधी त्यांनी शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे ते सतत चर्चेत असतात. नुकाताच अभिनेत्री काजोलने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.

काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच ती व्हिडीओमध्ये हवेत सफरचंद कापताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी तिचा हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.

काजोलचा हा व्हिडीओ पाहून एका यूजरने ‘अन्न वाया घालवू नका. अनेक लोकं उपाशी मरतायेत. अशा प्रकारच्या पोस्ट शेअर करु नका’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘लोकं उपाशी मरतायेत आणि तुम्हाला विनोद सुचतायेत. मॅडम अन्न वाया घालवू नका’ असे म्हटले आहे. सध्या काजोलला या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 1:29 pm

Web Title: kajol shares fruit ninja mood video netizens slam avb 95
Next Stories
1 “नेत्यांच्या मागे एवढी गर्दी असते, त्यांना लॉकडाउनचा नियम नाही का?”, केदार शिंदेचा सवाल
2 ‘मला धक्काच बसला..’, बिग बॉसच्या घरात राहुलने लग्नासाठी विचारताच अशी होती दिशाची प्रतिक्रिया
3 ‘सुल्तान’मधील अभिनेता कुमुद मिश्रा यांना झाला करोना
Just Now!
X