15 January 2021

News Flash

“वेळ आणि जागा सांग मी एकटा येतो”; सलमान खानला अभिनेत्याचं आव्हान

"मी तुझ्या चमच्यांना घाबरत नाही"; अभिनेत्याने सलमान खानला खडसावलं

अभिनेता कमाल आर. खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानवर निशाणा साधला आहे. केवळ पोकळ धमक्या देऊ नकोस वेळ आणि जागा सांग मी एकटा येतो. काय करायचं ते करुन दाखव असं आव्हान त्याने सलमानला दिलं आहे.

अवश्य पाहा – ‘बिहार प्रचारात माझ्यावर बलात्कार झाला असता’; अमिषा पटेलने प्रकाश चंद्रांवर केला आरोप

अवश्य पाहा – ‘या अभिनेत्रीला माझ्या मांडीवर बसवायचो; सलमानच्या प्रश्नावर अभिनेत्याचं वादग्रस्त विधान

नेमकं काय म्हणाला केआरके?

“भाईजान सलमान खान राहुल, डॉली, पंजाबी यांसारख्या तुझ्या चमच्यांना माझ्या मागे लावून तू काय साध्य करणार आहेस? केवळ तू तुझा वेळ वाया घालवतोयस. हिंमत असेल तर वेळ आणि जागा सांग मी एकटा येतो तिथे. काय करायचं ते कर मी तुला घाबरत नाही. मी फक्त सत्य बोलतो आणि मी बोलतच राहीन. तू माझा खरा आवाज शांत करू शकत नाहीस” अशा आशयाचं ट्विट करुन केआरकेने सलमानला आव्हान दिलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यापूर्वी त्याने ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमारवर निशाणा साधला होता. “देवी लक्ष्मी धन आणि सौभाग्यचं प्रतिक आहे. अक्षय कुमारने देवी लक्ष्मीचा अपमान केला आहे. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी प्रेक्षकांनी ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बहिष्कार टाकावा. म्हणावं हा कॅनडा नाही भारत देश आहे. इथे देवी-देवतांची पुजा केली जाते. त्यांची चेष्ठा करत नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन त्याने ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 7:02 pm

Web Title: kamaal r khan challenge salman khan mppg 94
Next Stories
1 Video : विकी कौशल दिसताच चाहतीने धरला हट्ट; म्हणाली…
2 कमाल केली… चित्रपटातील अंडरवॉटर सीनसाठी अभिनेत्रीने सात मिनिटं रोखला श्वास
3 कमल हासन यांच्यामुळे कोसळले नवाजुद्दीनला रडू, कारण…
Just Now!
X