11 August 2020

News Flash

काम्या पंजाबीला दुसऱ्या लग्नावरून ट्रोल करणाऱ्याला ‘चंद्रमुखी चौटाला’ने दिलं सडेतोड उत्तर

मुलगी असतानाही दुसऱ्यांदा लग्न का केलं असा प्रश्न एका नेटकऱ्याने काम्याला विचारला.

काम्या पंजाबी, कविता कौशिक

छोट्या पडद्यावर खलनायिकेच्या भूमिका साकारत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री काम्या पंजाबीने १० फेब्रुवारी रोजी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. काम्याला १० वर्षांची एक मुलगी आहे. मुलगी असतानाही दुसऱ्यांदा लग्न का केलं असा प्रश्न विचारत एका नेटकऱ्याने काम्यावर टीका केली. या टीकेचं सडेतोड उत्तर काम्याची जिवलग मैत्रीण ‘चंद्रमुखी चौटाला’ अर्थात अभिनेत्री कविता कौशिक हिने दिलं.

‘तुला मुलगी असतानाही तू दुसऱ्यांदा का लग्न केलंस’, असा सवाल काम्याला एका युजरने विचारला. यावर कविता कौशिकने लिहिलं, ‘तुम्हाला आयुष्यभरासाठी एक चांगला मित्र, साथीदार मिळावा यासाठी तुम्ही लग्न करता. मुलं जन्माला घालण्याव्यतिरिक्तही आपलं आयुष्य असतं. जे लोक त्यांच्या आयुष्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्यांदा संसार थाटतात, त्यांच्या चुका शोधू नका. असे फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा प्रयत्न करा.’

प्रियकर शलभ डांगसोबत काम्याने लग्न केलं. शलभलाही १० वर्षांचा मुलगा आहे. शलभ आणि काम्याच्या मुलांनी मिळून लग्नाच्या तयारीत बराच हातभार लावला असंही कविताने तिच्या ट्विटमधून सांगितलं.

काम्याने २००३ मध्ये व्यावसायिक बंटी नेही याच्याशी लग्न केलं होतं. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर २०१३ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. ‘बिग बॉस’, ‘क्यु होता है प्यार’, ‘बनू मैं तेरी दुल्हन’, ‘कहता हैं दिल’ अशा विविध मालिकांमुळे काम्या लोकप्रिय झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2020 12:34 pm

Web Title: kamya panjabi questioned by user for re marrying despite a child bff kavita kaushik gives a solid reply ssv 92
Next Stories
1 बिग बी- विक्रम गोखलेंचा याराना; एबी आणि सीडी’चं पोस्टर प्रदर्शित
2 सुनबाईचं रुपेरी पडद्यावर पदार्पण; तेजश्री प्रधान दिसणार बॉलिवूडपटात
3 नीना गुप्ता यांनी ‘या’ अभिनेत्यासोबत दिला होता पहिला किसिंग सीन
Just Now!
X