24 November 2020

News Flash

‘दबंग २’मधील फेविकॉल गाणं ऐकताच करीनाही हसू झालं होतं अनावर; म्हणाली…

'फेविकॉल' गाणं ऐकताच करीनाने दिली 'ही' प्रतिक्रिया

कलाविश्वातील आघाडी नायिका म्हणजे करीना कपूर-खान. उत्तम अभिनयशैली आणि बिंधास्त अंदाज यामुळे करीना अनेकांची क्रश आहे. त्यामुळे अनेक वेळा चाहत्यांमध्ये तिची चर्चा रंगत असते. यातच सध्या सोशल मीडियावर करीनाचा फेविकॉल या गाण्यातील बिहाइंड द सीनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती गाण्याचा अर्थ विचारताना दिसत आहे.

अभिनेता सलमान खान याचा लोकप्रिय ठरलेल्या दबंग २ या चित्रपटातील फेविकॉल हे गाणं विशेष गाजलं होतं. या गाण्यात करीना कपूर झळकली होती. विशेष म्हणजे या गाण्याचे बोल ऐकल्यानंतर हे नेमकं काय गाणं आहे असा प्रश्न तिने विचारला होता. हे गाणं  ‘फिल्मीकिडा’ यांनी शेअर केलं आहे.

 

View this post on Instagram

 

Expression Queen @filmykeeda123 . . . . . #kareenakapoorkhan #kareenakapoor #song #lyrics #fun #comedy #bebo

A post shared by B O L L Y W O O D (@filmykeeda123) on

व्हायरल होत असलेल्या माय जिप्सी विथ सायरन तयार ही ओळक ऐकू येत असून त्यावर हे काय गाणं आहे असं म्हणत करीना हसते आणि या गाण्याचा नेमका अर्थ काय असं विचारते.

दरम्यान, सध्या करीनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. करीना लवकरच लाल सिंह चड्ढा या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आमिर खान स्क्रीन शेअर करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 1:54 pm

Web Title: kareena kapoor fevicol song bts video viral on internet actress says what is the meaning of that ssj 93
Next Stories
1 सुशांत सिंह आत्महत्या; उद्धव ठाकरेंना चिराग पासवान यांचा फोन; मुख्यमंत्री म्हणाले…
2 “स्टार किड्सलाही करावा लागतो संघर्ष”; श्रुती हसनची घराणेशाहीवर प्रतिक्रिया
3 क्वारंटाइनचे नियम मोडण्याचा आरोप करणाऱ्यांना अभिनेत्याने दिले उत्तर, म्हणाला…
Just Now!
X