News Flash

दीपिका,कतरिनासोबत अडकल्यास मी जीव देईन- करिना

करणच्या प्रश्नावर करिनाचे हैराण करणारे उत्तर

'कॉफी विथ करण' कार्यक्रमात करिनाने दीपिका आणि कतरिना विषयी वक्तव्य केले.

बॉलिवूड निर्माता करण जोहर याच्यासोबत कॉफी घेताना ग्लॅमरस ममी करिना कपूरने धम्माल मस्ती केल्याचे दिसते. सोनम कपूरसोबत करिना ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय चॅट शोमध्ये दिसणार आहे. सोनम कपूर आणि करिनाच्या आगामी भागाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये करिना आणि सोनाक्षी दोघीही करणच्या व्यासपीठावर धमाल करताना दिसत आहेत. करिना आई होण्यापूर्वी या कार्यक्रमाचे चित्रकरण करण्यात आले होते. या कार्यक्रमात पाहुणे म्हणून निमंत्रित करुन करण बॉलिवूड कलाकारांकडून अनेक गोष्टींचा खुलासा करण्याचा प्रयत्न करत असतो. कार्यक्रमात कलाकारांना काही वेळा करणच्या कठीण प्रश्नांचा देखील सामना करावा लागतो. सोनम आणि करिनासोबतही असे काही किस्से प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळणार आहेत.

करण जोहरने या कार्यक्रमात करिनाला सध्याच्या घडीला हॉलिवूडसाठी सज्ज असणाऱ्या अभिनेत्रींविषयी प्रश्न विचारले आहेत. अर्थात प्रियांका आणि दीपिका पदुकोण यांच्यातील कोणती अभिनेत्री करिनाला अधिक आवडते? हे करणने जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. करणचा प्रश्न संपताच करिनाने दोघीही अभिनेत्री हॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचे सांगत दोघींना पसंती दिली. करणने करिनाची फिरकी घेण्यासाठी रणबीर सिंगच्या जुन्या प्रेमप्रकरणांना देखील उजाळा देण्याचा प्रयत्न केला. दीपिका आणि कतरिना यांच्याबद्दल करिनाला त्याने खोचक प्रश्न विचारला. या दोघींसह तू जर एकाच लिफ्टमध्ये अडकलीस तर तू काय करशील? असे विचारत करणने रणबीर कपूरच्या आयुष्यात आलेल्या प्रेयसींबद्दल करिनाची भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भावाच्या पूर्व नातेसंबंधांवर विचारलेल्या प्रश्नावर करिनाने दिलेले उत्तर हे हैराण करणारे असे होते. कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत जर लिफ्टमध्ये अडकले तर मला आत्महत्या करावी लागेल, असे करिना म्हणाली.

सध्या स्टार वर्ल्ड या वाहिनीवर करणचा ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शो चांगलाच गाजत आहे. अनेक बी टाऊन सेलिब्रिटींनी आतापर्यंत या कार्यक्रमात हजेरी लावत दिलखुलास गप्पा मारल्या होत्या. या कार्यक्रमाच्या नुकत्याच पार पडलेल्या भागामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस यांनी हजेरी लावली होती. सोनम आणि करिनाच्या या धम्माल गप्पा लवकरच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत.  तुर्तास या कार्यक्रमाचे टिझर पाहून अनेकजण नेमके करिना आणि सोनम कार्यक्रमात आणखी कोणते खुलासे करणार याबद्दलचे अंदाज बांधत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 6:43 pm

Web Title: kareena stuck with deepika and katrina
Next Stories
1 ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांकडून सलमानची फसवणूक
2 ..या अभिनेत्याच्या चित्रपटासाठी परदेशात जाहीर केली एक दिवसाची सुट्टी
3 शौर्य- गुन्ह्याच्या मुळाशी जाण्याची पोलिसांची दुरदृष्टी
Just Now!
X