News Flash

अशा प्रकारे किरण कुमार यांनी केली करोनावर मात, सांगितला अनुभव

त्यांची काही दिवसांपूर्वी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड गायिका कनिका कपूर पाठोपाठ इतर कलाकारांनादेखील करोनचा संसर्ग झाल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेते किरण कुमार यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर त्यांची दुसरी करोना चाचणी देखील पॉझिटीव्ह आली. आता त्यांच्या तिसऱ्या चाचणीचे रिपोर्ट्स समोर आले आहे.

किरण कुमार यांची तिसरी करोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यानंतर त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे. ‘काही दिवसांपूर्वी मी माझा नेहमीचा चेकअप करुन घेतला होता. त्यावेळी माझ्या अनेक चाचण्या झाल्या. त्यात करोना चाचणीचा देखील समावेश होता. माझ्यासोबत तेव्हा माझी मुलगी बसली होती आणि आम्ही मस्ती करत होतो. माझी करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे कळताच आम्ही काही तासांमध्ये घराच्या एका मजल्याचे आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतर केले’ असे त्यांनी म्हटले.

‘हिंदुजा आणि लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी आम्ही घाबरु नये म्हणून खूप मदत केली. आम्ही याबाबत बीएमसीला माहिती दिली. आज माझी करोना चाचणी करण्यात आली आणि ती निगेटीव्ह आल्याचे सांगताना मला आनंद होत आहे. माझे संपूर्ण कुटुंब अजूनही आयसोलेशनमध्ये आहे. मला कोणतेही लक्षण जाणवत नव्हते’ असे त्यानी पुढे म्हटले आहे.

करोनावर मात करण्यासाठी किरण यांनी घरगुती उपचार म्हणून हळदीचा वापर केला होता. तसेच त्यांनी स्वत: ला क्वारंटाइन केल्यानंतर मेडीटेशन केले होते. वेब सीरिज पाहिल्या, पुस्तके वाचली होती.

किरण यांनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि इतर सदस्यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी लोकांना करोनाचा संसर्ग झाल्याने खचून न जाता सकारत्मक राहण्याचा सल्ला दिला आहे. किरण कुमार यांच्या आधी कनिका कपूर, चित्रपट निर्माते करीम मोरानी, त्यांच्या दोन्ही मुली झोया आणि शाजिया यांना करोना झाल्याचे समोर आले होते. मात्र त्यांनी सर्वांनी करोनावर मात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 4:13 pm

Web Title: kiran kumar 3rd corona test negative avb 95
Next Stories
1 Video : बिग बी-आयुषमानमध्ये ‘जूतम फेंक’; गुलाबो सिताबोचं पहिलं गाणं प्रदर्शित
2 बिग बी म्हणतात, “बाहुबलीपेक्षाही माझ्या ‘या’ चित्रपटाने केली होती जास्त कमाई”
3 अब्बा किंवा पप्पा नाही, तैमुर सैफला ‘या’ नावाने मारतो हाक
Just Now!
X