अभिनेता कमाल आर खान हा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपासून बॉलिवूड गायक मिका सिंग आणि केआरकेमध्ये वाद सुरु आहेत. दोघे सतत एकमेकांबद्दल काही ना काही बोलताना दिसतात. तर, मिकाने केआरकेवर एक गाणं देखील तयार केलं होतं. आता केआरकेने मिका सिंगवर एक गाणं तयार केलं आहे. केआरकेच्या त्या गाण्यावर कारवाई करत युट्यूबने हे गाणं काढलं असून केआरकेच्या युट्यूब चॅनलला एक आठवड्यासाठी ब्लॉक केले आहे. दरम्यान, हे पाहता केआरकेने युट्यूबवर निशाना साधत मिका सिंगसोबत असे का केले नाही असा प्रश्न विचारला आहे.
केआरकेने सोमवारी त्याच्या युट्यूब चॅनलवर ‘सुअर’ नावाने एक गाणं प्रदर्शित केले होते. या आधी मिकाने ११ जून रोजी ‘केआरके कुत्ता’ हे गाणं प्रदर्शित केलं होतं. तर, सलमान आणि केआरकेमध्ये सुरु असलेल्या वादात मिकाने मध्येच एण्ट्री केली होती. त्यानंतर मिका सिंग आणि केआरकेमध्ये सतत वाद सुरु असल्याचे दिसते.
केआरकेने ट्वीट करत सांगितले की, “तुम्ही वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे नियम वापरतात हे सिद्ध झालं आहे. आता पर्यंत शेकडो लोकांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये माझा फोटो आणि व्हिडीओ फुटेज वापरले आहेत. परंतु तुम्ही माझी तक्रार कधीही स्वीकारली नाही. याचा अर्थ असा आहे की मला त्रास देण्यासाठी तुम्ही त्यांची मदत करत आहात.”
आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील नवीन सोनू कोणाला आवडत नव्हती, गोलीने केला खुलासा
केआरके मिकाच्या ‘केआरके कुत्ता’ या गाण्याची लिंक शेअर करत म्हणाला, “हा व्हिडीओ त्रास देण्या योग्य नाही, त्यांनी तर माझे फोटो आणि व्हिडीओ वापरले आहेत. परंतु माझा व्हिडीओ हा त्रास देण्यासारखा आहे. इथे मी फक्त त्याच्या फोटोंचा वापर केला आहे. याचा अर्थ युट्यूब आणि टीम युट्यूब मला त्रास देण्यासाठी त्याला मदत करत आहेत. कोर्टात भेटू.”
दरम्यान, केआरकेने दावा केला आहे की तो लोकप्रिय असल्यामुळे त्याच्यावर ११ मानहानीचे खटले सुरु आहेत. तर सलमानच्या ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ या चित्रपटाच्या निगेटिव्ह रिव्ह्यूवरून सलमानने त्याच्यावर मानहानीचा दावा केला असे केआरकेने सांगितले. तर, सलमान भ्रष्टाचारी आहे, आणि त्याचे ब्रॅंड ‘बिंग ह्युमन’ हे सगळ्यांची फसवणूक, हेराफेरी आणि ते मनी लॉंड्रींगच्या व्यवसायात गुंतले आहेत असा आरोप केला, त्यामुळे केआरके विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे, असे सलमानच्या टीमने सांगितले.