अभिनेत्री लिझा रे सध्या चंदेरी दुनियेतून गायब असल्याचे चित्र आहे. ‘विरप्पन’ या चित्रपटामध्ये छोटी भूमिका साकारणाऱ्या लिसा सध्या महिला सबलीकरण, कर्करोगावरील रुग्ण आणि योगा यांच्यासाठी कार्य करत आहे. कर्गरोगावर मात करणाऱ्या लिझाला आपला कर्करोगाविरोधातील संघर्ष चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर आणायची इच्छा आहे. अभिनय क्षेत्रात अपघाताने आल्याचे सांगताना लिसाने बॉलिवू़ड क्षेत्रापासून दुर असल्यावर कोणताही फारसा फरक माझ्या जीवनावर पडत नसल्याचे तिने म्हटले आहे. कर्करोगाच्या सध्या कोणताही त्रास होत नसल्याचे देखील लिझाने यावेळी स्पष्ट केले आहे.

बॉलिवूड क्षेत्रात करिअर करण्याची कोणती इच्छा नव्हती, मी अपघाताने या क्षेत्रात आले. त्यामुळे बॉलिवूडपासून दुर राहिल्यामुळे जीवनात फारसा फरक जाणवत नसल्याचे ती म्हणाली. वयाच्या १६ व्या वर्षी वयक्तिक कारणास्तव मला व्यावसायिक क्षेत्रात यावे, लागले. एका वर्षामध्ये सर्व ठिक होईल असे वाटले होते. पण गेल्या २५ वर्षापासून आपल्या अटींवर व्यवसाय करत असून मला हवे तसे यश देखील मिळत असल्यामुळे सध्या मी आनंदीअसल्याचे लिझाने यावेळी म्हटले.
कर्गरोगामुळे मला जीवनाचे महत्त्व समजले. जीवनामध्ये कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावे, कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे याची शिकवण मला कर्करोगाने दिली. असे सांगताना लिझाने आपल्या ताकदीवर विश्वास असल्याचेही सांगितले.

आपल्यातील विश्वासाची भावना व्यक्त करताना लिसाने प्रत्येकात लढण्याची क्षमता असल्याचे देखील म्हटले आहे. भारतामध्ये कर्करोगाविषयी अत्यंत भीतीचे वातावरण आहे. हे वातावरण कमी करण्यासाठी मला माझ्या कर्करोगावरील लढा लोकांपर्यंत पोहचवायचा आहे. कर्करोगावरील संघर्षची कथा  कर्करोग पीडितांसाठी नक्कीच प्रेरणादायी असेल असे, लिझाला वाटते. लिझाने यावर्षी आपल्या कर्करोगावरील कहाणीवर एक डॉक्युमेंट्री केली आहे. त्यानंतर आता लिझाला आपल्या आजारातील त्रास आणि संघर्ष यांना चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडायचे आहे.  यासाठी लिझा लवकरच लिखाणाला देखील सुरुवात करणार आहे. कर्करोगावर आधारित या चित्रपटामध्ये अतिशोक्तीला थार नसेल, असेही लिझाने लिखाणापूर्वीच स्पष्ट केले.