News Flash

चहापानाला गेला आणि काढा पिऊन आला; मनीष पॉल आणि स्मृती इराणींच्या भेटीचा मजेदार किस्सा

नुकतीच मनीषने केंद्रीय कॅबिनेट मंत्री स्मृती इराणींची भेट घेतली. मनीष आणि स्मृती इराणींच्या भेटीचा फोटो व्हायरल होतोय.

(photo credit- Manish Paul /Instagram.)

लोकप्रिय टेलिव्हिजन होस्ट आणि अभिनेता मनीष पॉल सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांशी सतत संपर्कात असतो. दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तो सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या चाहत्यांशी संवाद साधतो. नुकतीच मनीषने केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि खासदार  स्मृती इराणींची भेट घेतली. त्यावेळेस घडलेला एक मजेदार किस्सा मनीषने नेटकऱ्यांसोबत शेअर केला.

करोना काळात बऱ्याच जणांनी चहाला काढ्याने रिप्लेस केले आहे. टेलिव्हिजनचा लोकप्रय होस्ट, आभिनेता मनीष पॉलने जेव्हा स्मृती इराणींची भेट घेतली तेव्हा स्मती इराणींने मनीषाचा उत्तम पाहूणचार केला. मात्र यावेळी त्यांनी मनीषला चहा ऐवजी चक्क काढा दिला. या खास भेटीचा एक फोटो शेअर करत मनीषने घडलेला मजेदार किस्सा शेअर केला आहे. मनीषने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तो आणि स्मृती इराणी सोफ्यावर बसून फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. या फोटोत स्मृती इराणींनी करड्या रंगाचा सूट परिधान केलाय तर मनीषने काळ्या रंगाचं टि-शर्ट आणि डेनिम्स परिधान केल्याचं दिसत आहे.

View this post on Instagram

 

A post shared by Maniesh Paul (@manieshpaul)

या पोस्टखाली मनीषने एक मजेशीर किस्सा नेटकऱ्यांबरोबर शेअर केला. मनीष लिहतो ‘ स्मृती इराणी मॅम या काढ्याच्या कपासाठी थँक्यू ,काय वेळ आली आहे चहाच्या जागी आता काढा प्यावा लागतोय. पण थँक्यू, मला बोलावण्यसाठी ‘ पुढे मनीष लिहतो ‘ मास्क फक्त फोटोसठी काढला होता.” असं तो म्हणाला आहे. खासदार स्मृती इराणी या सोशल मीडीयावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. मनीषची ही पोस्ट पाहताच काही वेळातच स्मृती इराणींनी मनीषच्या या पोस्टची स्टोरी शेअर केली आणि लिहले ‘ काढा युक्त, चिंता मुक्त’.

Smriti Irani Insta Story Photo- smriti Irani Insta Story.

मनीष पॉल आणि स्मृती इराणींच्या या भेटीचा हा फोटो सोशल मीडिया सध्या चांगलाच चर्तेत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर स्मृती इराणींनी केलेल्या या खास पाहुणाचाराचं काही नेटकऱ्यांनी कौतुक केलंय.

मनीष पॉलने आजवर इंडियन आयडॅाल , सा रे गा मा पा लिटिल चॅम्पस् असे बरेच रियालीटी शो होस्ट केले असुन अनेक सिनेमा आणि पुरस्कार सोहळ्यांमधून मनीषने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2021 7:30 pm

Web Title: manish paul shares funny story behind his recent post with actor turn politician smriti irani aad 97
Next Stories
1 घटस्फोटानंतर मिनिषा लांबा पुन्हा एकदा प्रेमात
2 जान्हवी कपूरच्या बिकिनी लूकपेक्षा सोबत असलेल्या मिस्ट्री मॅनची चर्चा
3 VIDEO: संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तचा ‘वर्कआउट मोड’ ; फॅन्ससह सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव
Just Now!
X