मनोज वाजपेयी भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांवर त्यांने आपल्या अफलातून अभिनयाची छाप सोडली आहे. कुठलीही ओळख किंवा फिल्मी बॅकग्राउंड नसतानाही आज तो बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. मात्र मनोज वाजपेयीचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. बॉलिवूडमध्ये जम बसवण्यासाठी मुंबईत आलेल्या मनोज वाजपेयीला मोठा संघर्ष करावा लागला होता.

काही वर्षांपूर्वी मनोजने त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचं सांगितलं होतं. काम नसल्याने आणि पुरेसे पैसे नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचं त्याने सांगितलं होतं. मात्र यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला मदत करून त्याचा जीव वाचवला. मनोजने त्याच्या वडिलांकडे अभिनयात करिअर करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांनी कशी प्रतिक्रिया दिली याबद्दल सांगितलं.

साधारण कुटुंबात गेलं बालपण

एका मुलाखतीत त्याने सांगितलं, ” मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. बिहारमधील एका छोट्याश्या गावात पाच भावंडांसोबत माझं बालपण गेलं. आम्ही अगदी साध आयुष्य जगत होतं. झोपडी सारख्या एका शाळेत आम्ही शिक्षण घेतलं. मात्र आम्ही जेव्हीही शहरात फिरायला जायचो तेव्हा चित्रपटगृहात जाऊन सिनेमा नक्की पाहायचो. मी बिग बी अमिताभ बच्चन यांचा मोठा फॅन होतो. त्यावेळी मी अवघ्या नऊ वर्षांचा होतो. तेव्हा पासूनच मला अभिनयाची आवड जडली आणि एके दिवशी अभिनयात करिअर करण्याचं मी ठरवलं.” असं त्याने सांगितलं.

जेव्हा वडिलांना पत्र लिहलं

17 वर्षांचा असताना मनोजने गावं सोडलं आणि तो पुढील शिक्षणासाठी दिल्लीला गेला. यावेळीदेखील त्याचं संपूर्ण लक्ष अभिनयावर होतं. दिल्ली विद्यापीठात मनोजने अभिनय कार्यशाळेत प्रवेश घेतला होता. मात्र ही गोष्ट त्याने कुटुंबीयांपासून लपवून ठेवली. काही काळाने मनोजने वडिलांना एक पत्र लिहून ही गोष्ट सांगितली. यावर तो म्हणतो, ” माझे वडिल माझ्यावर रागावले नाहीत उलट त्यांनी मला माझी फी भरण्यासाठई 200 रुपये पाठवले. माझा गावातील लोकांनी मला बरचं डावललं. मी काही कामाचा नाही असं म्हणाले. मात्र मी कुणाचही ऐकलं नाही” असा अनुभव मनोजने शेअर केला.

सत्या सिनेमामुळे मनोज वाजपेयीला खरी ओळख मिळाली. या सिनेमानंतर त्याच्या करिअरमध्ये मोठं वळण आलं. त्यानंतर मनोजने खलनायकाच्या भूमिकेसोबतच अनेक गंभीर, विनोदी अशा विविध प्रकराच्या भूमिका साकारत प्रेक्षकांची पसंती मिळवली.