News Flash

मुंबई पोलिसांसोबत सिद्धार्थ जाधवचा सेल्फी, म्हणाला तुम्हाला मानाचा सलाम !

सोशल मीडियावर शेअर केला सेल्फी

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लॉकडाउन करण्यात आलं होतं. या काळात अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवण्यात मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी मोलाची भूमिका बजावली. आपल्या घरातल्या लोकांची पर्वा न करता पोलीस बांधव रस्त्यावर तैनात होते. अनेक भागांत बंदोबस्तादरम्यान पोलिसांवर हल्लेही झाले, परंतू पोलिसांनी कधीही आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही.

लॉकडाउन काळात ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकार अनलॉकच्या माध्यमातून काही गोष्टींना हळुहळु मान्यता देत आहेत. महाराष्ट्रात सलून सुरु करण्यात आलेली आहेत. मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव या काळात आपला फिटनेस कायम राखण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात व्यायामासाठी हजेरी लावत असतो. यादरम्यान बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसोबत सिद्धार्थ जाधवने सेल्फी काढत त्यांची इच्छा पूर्ण केली आहे. हा सेल्फी सिद्धार्थने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकला आहे.

खडतर काळात आपलं कर्तव्य बाजवणाऱ्या सर्व मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांना मानाचा सलाम असं म्हणत सिद्धार्थने पोलिसांचं कौतुक केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 9:13 pm

Web Title: marathi actor siddarth jadhav share selfie with mumbai police psd 91
Next Stories
1 बिकिनीत दिसली ‘Ertugrul Ghazi’मधील अभिनेत्री, पाकिस्तानी चाहत्यांनी केले ट्रोल
2 ‘कुली नंबर १’ होणार सुपरफ्लॉप? अभिनेत्याच्या ऑनलाईन सर्वेमध्ये वरुणला नापसंती
3 लाव रे तो व्हिडीओमध्ये ‘मुळशीपॅटर्न’मधील पिट्ट्याभाईची एण्ट्री
Just Now!
X