आज समाजात पाहायला गेलं तर प्रत्येक स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. कोणतंही क्षेत्र असो महिला त्यामध्ये मोठ्या हिंमतीने आणि जिद्दीने उतरत असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे एक स्त्री ही देवीचचं रुप आहे असं म्हटलं जातं. सध्या सर्वत्र नवरात्रीचं वातावरण आहे. या काळात देवीची पुजा करण्यासोबतच काही जण आपल्या आयुष्यातील स्त्रीचं स्थान, तिचं कार्य या सगळ्यांना सलाम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यात अभिनेता स्वप्नील जोशी याने त्याच्या पत्नीला दुर्गा म्हटलं असून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

“My Wife, My Durga! माझा आरसा! खूप fun, खूप happy, आणि थोडी eccentric. माझे गुणदोष मला तोंडावर सांगते, हातचं न राखता… जी माझा परिवार खंबीरपणे सांभाळते म्हणून कामाचे वाट्टेल तेवढे तास, वेळा, स्ट्रेस याचं काहीच वाटत नाही. जी तिचं घर सोडून माझ्या घरात आली आणि तिचे जन्मदाते नसलेल्या आईवडिलांना भरभरून माया दिली. घरातल्या सगळ्यांची काळजी, विचारपूस आणि प्रेम तर इतकं करते कि थक्क व्हायला होतं. असे प्रसंग कमी येतात की बसून तिला सांगावं, तिचं महत्व… कृतज्ञता व्यक्त करावी..,” अशी पोस्ट स्वप्नीलने त्याच्या बायकोसाठी लिहिली आहे.

siddharth chandekar shares post for chinmay mandlekar
“जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत…”, सिद्धार्थ चांदेकर ट्रोलर्सवर संतापला; चिन्मय मांडलेकरला केली विनंती
Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
actor Gaurav S Bajaj welcomes baby girl
लोकप्रिय अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा, पत्नीने दिला गोंडस बाळाला जन्म, आनंद व्यक्त करत म्हणाला, “चैत्र नवरात्रीत…”
Make Home Made Gudi Padwa special Instant Sevai Kheer Note the Tasty Recipe
गुढीपाडव्या निमित्त बनवा स्पेशल स्वादिष्ट ‘शेवयाची खीर’ ; नोट करा रेसिपी

 

View this post on Instagram

 

My Wife, My Durga! माझा आरसा! खूप fun, खूप happy, आणि थोडी eccentric. माझे गुणदोष मला तोंडावर सांगते, हातचं न राखता… जी माझा परिवार खंबीरपणे सांभाळते म्हणून कामाचे वाट्टेल तेवढे तास, वेळा, स्ट्रेस याचं काहीच वाटत नाही. जी तिचं घर सोडून माझ्या घरात आली आणि तिचे जन्मदाते नसलेल्या आईवडिलांना भरभरून माया दिली. घरातल्या सगळ्यांची काळजी, विचारपूस आणि प्रेम तर इतकं करते कि थक्क व्हायला होतं. असे प्रसंग कमी येतात की बसून तिला सांगावं, तिचं महत्व… कृतज्ञता व्यक्त करावी.. बायको, you are my wife, my immunity booster, hardcore critic, and the backbone of my family. Keep inspiring me with your madness! @lee1826 #navratri2020 #durga #durgapuja

A post shared by