30 September 2020

News Flash

संपदा जोगळेकर ‘लोकसत्ता डिजिटल अड्डावर’; तुम्हालाही मिळणार प्रश्न विचारण्याची संधी

संपदा जोगळेकरला विचारा तुमचे प्रश्न

‘आईचं घर उन्हाचं’, ‘घर तिघांचं हवं’, ‘ऑल दी बेस्ट’ या नाटकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे संपदा जोगळेकर- कुलकर्णी. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबच तिने लेखन, निवेदन आणि नृत्य या क्षेत्रांमध्येही आपला ठसा उमटविला आहे. सतत स्वत:ला कार्यरत ठेवणारी आणि प्रत्येक नवीन गोष्ट आवडीने शिकणारी ही अष्टपैलू अभिनेत्री लवकरच ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर प्रेक्षकांशी संवाद साधायला येणार आहे.

मंगळवार, १६ जून रोजी सकाळी ११ वाजता संपदा जोगळेकरसोबत गप्पा रंगणार आहेत. विशेष म्हणजे या मुलाखतीत प्रेक्षकांनाही सहभागी होता येणार आहे. Loksattalive या फेसबुक पेजवर ही मुलाखत तुम्हाला पाहता येईल. त्यामुळे न विसरता मंगळवार, १६ जून रोजी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये नक्की सहभागी व्हा आणि तुमचेही प्रश्न तयार ठेवा.

यासाठी लोकसत्ताच्या Loksattalive या फेसबुक पेजला लाइक करा आणि फॉलो करा… म्हणजे तुम्हाला या आणि अशा व्हिडीओ मुलाखतींमध्ये फेसबुकवर सहभागी होता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2020 5:43 pm

Web Title: marathi actress sampada joglekar on loksattadigital adda watch his interview on facebook live ssj 93
Next Stories
1 ‘पवित्र रिश्ता’ची निर्माती एकता कपूरने स्क्रीनशॉट शेअर करत सुशांतच्या निधनावर केले ट्विट
2 “आमची कधी भेट झाली नव्हती, पण…”; सुशांतच्या मृत्यूवर लता मंगेशकरांनी व्यक्त केल्या भावना
3 अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Just Now!
X