News Flash

Tubelight poster: ‘दो भाई आ रहे है..’

'ट्युबलाइट'च्या टिझरकडेच साऱ्यांच्या नजरा..

छाया सौजन्य- सोशल मीडिया

बॉलिवूड स्टार सलमान खानच्या कोणत्याही चित्रपटाआधी नेहमीच हटके पद्धतीने प्रसिद्धी करत वातावरण निर्मिती केली जाते. चित्रपटाच्या निर्मिती संस्थेपासून ते अगदी त्या चित्रपटातील स्टारकास्टच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शक्य तितक्या कलात्मकतेने भाईजानच्या चित्रपटांचं प्रमोशन केलं जातं. सध्या सलमानचा ‘ट्युबलाइट’ हा चित्रपटही गाजतोय तो त्याच्या प्रसिद्धी तंत्रामुळे.

सलमान स्टारर ‘ट्युबलाइट’ या आगामी चित्रपटाचा टिझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, हा टिझर प्रदर्शित करण्यापूर्वीच टिझरसाठीची उत्सुकता वाढवण्यासाठी त्याच्या या आगामी चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. सलमानने त्याच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘ट्युबलाइट’चे विविध पोस्टर शेअर केले आहेत. त्यातीलच नव्या पोस्टरने अनेकांचं लक्ष वेधलंय.

‘ट्युबलाइट’च्या या नव्या पोस्टरमध्ये सलमानसोबतच अभिनेता सोहेल खानही दिसत आहे. गाडीच्या टपावर बसलेले सलमान आणि सोहेल नेमके कुठे जात आहेत हे तर चित्रपटाच्या टिझरमधून कळेलच. पण, प्रथमदर्शनी पाहिलं तर पोस्टरमधील गाडीच्या पाटीवर ‘जगतपूर टू रानीखेत’ अशी पाटी दिसतेय. ‘ट्युबलाइट’चे आतापर्यंतचे पोस्टर पाहता या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सलमानसोबतच चिनी अभिनेत्री झू झूसुद्धा झळकणार आहे. तिच्याशिवाय अभिनेता सोहेल खान, बालकलाकार माटिन रे तंगू, दिवंगत अभिनेते ओम पुरीसुद्धा या चित्रपटात झळकणार आहेत. मुख्य म्हणजे बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसुद्धा या चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे कबीर खानने सर्वार्थाने हा चित्रपट परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. लडाख आणि उत्तर भारतातील काही ठिकाणी या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.

‘ट्युबलाइट’ व्यतिरिक्त सलमान सध्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणातही व्यस्त आहे. ‘टायगर जिंदा है’मधून तो अभिनेत्री कतरिना कैफसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. एकेकाळी दबंग खानची प्रेयसी म्हणून चर्चेत असलेली कतरिना पुन्हा सलमानसोबत स्क्रिन शेअर करत असल्यामुळे या दोघांचीही ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 4:14 pm

Web Title: meet dabang bollywood actor salman khan sohail khan in this new still from upcoming movie directed by kabir khan
Next Stories
1 ‘बेवॉच’च्या पोस्टरवर फक्त प्रियांकाचीच जादू
2 कतरिनाचा द्वेष करणाऱ्यानेही केले तिचे स्वागत
3 कपिलच्या शोमधील या कलाकारासोबत लग्न करणार सुगंधा मिश्रा?
Just Now!
X