‘बिग बॉस’च्या घरातील १३ सर्वसामान्य स्पर्धकांपैकी एक, ३७ वर्षांचा प्रमोद दाहिया सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुळचा सोनीपत, हरियाणाचा प्रमोद सध्या मुंबईत राहात आहे. व्यावसायिक जीवनात प्रमोद एक अभिनेता आणि लेखक आहे. त्याला वाचनाची, गाणी ऐकण्याची खेळण्याची आणि व्यायामाची आवड आहे. तसेच विविध ठिकाणी फिरण्यालाही प्रमोद प्राधान्य देतो. प्रमोदने ‘मुद्रा इन्स्टिट्युट ऑफ कम्युनिकेशन’मधून ‘क्रिएटिव्ह रायटिंगचे’ शिक्षण घेतले आहे.
त्याचे सोशल मीडियावरील अकाऊंट पाहता अभिनय क्षेत्रामध्येही प्रमोद बराच सक्रिय असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे अभिनय हा त्याच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. ‘कल कभी नही आता’ या वक्यावर प्रमोदचा विश्वास आहे. त्यामुळे काहीसे वेगळे पण प्रभावी व्यक्तिमत्व असणाऱ्या प्रमोदला प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडता येऊ शकते.

एक लेखक असल्यामुळे चांगल्या विचारांचे तो नेहमीच समर्थन करत असतो. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याने गौतम बुद्धांचे विचार फॉलो केले आहेत. ‘आज आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांमुळेच आहोत. आपण जसा विचार करतो, तसेच घडत जातो’, असे त्यात लिहिले आहे. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनाने पाहणाऱ्या प्रमोदला नेहमीच वर्तमानात जगण्याची सवय आहे. त्यामुळे उर्वरित १२ स्पर्धकांसाठी प्रमोद एक चांगलेच आव्हान ठरणार आहे. येत्या काळात सकारात्मक दृष्टीकोम असणारा हा हरियाणवी प्रमोद प्रेक्षकांवर छाप पाडण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

१६ ऑक्टोबरला या वादग्रस्त आणि बहुचर्चित कार्यक्रमाची सुरुवात होणार आबहे. यंदा बिग बॉसच्या १० व्या पर्वामध्ये अभिनेता सलमान खान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.