News Flash

बिग बी अमिताभ बच्चन यांची नात पुन्हा ट्रोल, ‘त्या’ युजरला नव्या नंदा म्हणाली…

ट्रोलरला नव्याचं सडेतोड उत्तर

बिग बी अमिताभ बच्चन यांची नाच नव्या नवेली सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. देशातील आणि महिलांशी संबंधित अनेक मुद्यांवर ची सोशल मीडियावर तिचं मत मांडत असते. अनेकदा नव्याला ट्रोलर्सना सामना करावा लागतो. मात्र सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना नव्या सडेसोड उत्तर देताना दिसते. नुकतीत नव्याने तिच्या एका प्रोजेक्टच्या निमित्ताने पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवरून एका युजरने नव्याची थट्टा करण्याचा प्रयत्न केला. मात्र या नेटकऱ्याला नव्याने सडेतोड उत्तर दिलं आहे.

नुकतीच नव्य़ाने तिच्या प्रोजेक्टशी संबंधित एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. नव्या आणि तिच्या संस्थेने गडचिरोलीमध्ये पहिल्या ” Period Positive Home” चं उद्धाटन केलंय. ही पोस्ट शेअर करत नव्याने आनंद व्यक्त केला. तर अनेकांनी कमेंट करत नव्याचं कौतुक केलं. मात्र एका युजरने नव्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)

एका युजरने नव्याच्या पोस्टवर कमेंट करत प्रश्न विचारला, “जर प्रोजेक्ट तुझ्यासाठी इतकाच महत्वाचा होता तर उद्धाटनासाठी तू तिथे का गेली नाहीस?” असं युजरने विचारलं. यावर नव्याने युजरला उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, ” मला असं वाटतं की आपण सर्व एका महामारीचा सामना करत आहोत याची तुम्हाला कल्पना असेल.” असं उत्तर नव्याने दिलं आहे. नव्याच्या या उत्तरावर अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे.

 

याआधी देखील नव्याने ट्रोलर्सची बोलती बंद केली होती. नव्याची आऊ श्वेता बच्चन नंदा काय करते? असा प्रश्न तिला विचारला गेला होता. तेव्हा नव्या म्हणाली होती, “ती एक लेखिका आहे. डिझायनर आहे आणि आई आहे.” यासोबतच नव्याने गृहिणींच्या कामाला कमी समजू नये असं म्हणाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 9:58 am

Web Title: navya nanda gives back to troll on social media we are middle of pandemic kpw 89
Next Stories
1 ‘पावरी’नंतर आता ‘पुलाव’ ट्रेंडमध्ये, ट्रोल करणाऱ्यांना मिळणार आता ‘या’ अंदाजात उत्तर
2 संगीतकार वाजिद यांची पत्नी मालमत्तेच्या वादामुळे न्यायालयात
3 करोनातून बरी झाल्यावर भूमी पेडणेकर झाली करोना योद्धा; म्हणाली, “या लढाईत हे …”
Just Now!
X