News Flash

विनोदवीर कपिल शर्माच्या यशाचा प्रवास आता विद्यार्थ्यांच्या अभ्यासात

कपिलची चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

भारताचा कॉमेडी किंग म्हणून कपिल शर्मा ओळखला जातो. कपिलचा साधारण कुटूंबातून येऊन कॉमेडी किंग होण्यापर्यंतचा प्रवास हा खडतर होता. त्याचा हाच खडतर प्रवास आता मुलांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग झाला आहे. त्याचा फोटो कपिलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहून कपिलच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटस्टोरीवरून ही माहिती दिली. त्याच्या एका फॅन क्लबने ती पोस्ट शेअर केली होती. तिच पोस्ट कपिलने त्याच्या स्टोरीवर शेअर केली. या स्टोरीमध्ये इयत्ता ४थी मधील मुलांना जीकेच्या पुस्तकातून कपिल शर्माचा धडा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या धड्यात कपिलचा ‘ द कपिल शर्मा शो’च्या सेटवरील एक फोटो आणि एक ‘किस-किस को प्यार करूं’ या चित्रपटातील आहे. कपिलच्या या धड्याला ‘द कॉमेडी किंग कपिल शर्मा’ असे नाव दिले आहे.

कपिलचे लाखो चाहते आहेत. स्टँड अप कॉमेडीपासून ते कॉमेडी किंग पर्यंतचा त्याचा प्रवास हा ४थी च्या जीकेच्या पुस्तकात दाखवण्यात आला आहे. कपिल आता लवकरच नेटफ्लिक्सवर त्याचा कॉमेडी शो घेऊन येणार आहे. कपिलला त्याच्या ‘कपिल शर्मा शो’च्या एका एपिसोडसाठी त्याला ३० ते ३५ लाख रूपये मिळतात असे म्हटले जाते. त्यात आता त्याच्या शोचे नवीन पर्व हे मे महिन्यात सुरू होणार असल्याने त्याला तेव्हा एका एपिसोडसाठी ५० लाख रुपये मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2021 8:48 pm

Web Title: now childrens will learn about kapil sharma s life being a standup comedian to comedy king dcp 98
Next Stories
1 ‘महाभारत’ मधील इंद्राची भूमिका साकारणाऱ्या सतीश कौल यांचं करोनामुळे निधन
2 समलैंगिक संबंधावर आधारित ‘हिज स्टोरी’ वादात; एकता कपूरवर पोस्टर चोरीचा आरोप
3 डिलीव्हरी रूममधील फोटो शेअर करत, माहीने सांगितला ‘त्या’ क्षणाचा अनुभव
Just Now!
X