25 February 2021

News Flash

तुला अजून खूप पुढे जायचे होते… सुशांतच्या आत्महत्येवर अभिनेत्याचे ट्विट

प्रकाश राज यांनी ट्विट करत सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे.

सुशांत सिंह राजपूत

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात असल्यामुळे सुशांतने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत कोणतीही माहीती मिळालेली नाही. त्याच्या आत्महत्येनंतर चाहत्यांसोबतच चित्रपटसृष्टीमधीस सर्व कलाकारांना धक्का बसला. अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विट करत सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रकाश राज यांनी ट्विटमध्ये, ‘तुला आणखी खूप पुढे जायचे होते.. खूप दु:ख झाले आहे. माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. तू खूप लवकर आम्हाला सोडून गेलास’ असे प्रकाश राज यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रकाश राज यांच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान, अनुपम खेर अशा अनेक कलाकांनी सोशल मीडियाद्वारे सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. अनेकांना सुशांतने आत्महत्या केल्याचे कळाताच धक्का बसला होता.

महेंद्र सिंह धोनीच्या बायोपिकमध्ये काम केल्यामुळे सुशांत सिंह राजपूत चर्चेत होता. तेव्हा त्याच्या अभिनयाची वाहवा झाली होती. त्यानंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. त्याने ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘ड्राइव्ह’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला. ‘छिछोरे’ चित्रपटात नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलाच्या वडिलांची भूमिका त्याने साकारली. निराशा, अपयश यामुळे आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेणे चुकीचे आहे हा संदेश चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुशांतने स्वत:चे आयुष्य त्या मार्गाने कसे संपवले असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 5:44 pm

Web Title: prakash raj tweet on sushant singh rajput suicide avb 95
Next Stories
1 “ही आत्महत्या नाही, हत्याच”; सुशांतच्या मृत्यूवरून कंगना भडकली
2 अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
3 सुशांत सिंहची मैत्रीण रिया चक्रवर्तीची पोलिसांकडून चौकशी होणार?
Just Now!
X