गेल्या काही वर्षात मराठी सिनेसृष्टीत अनेक दर्जेदार मराठी सिनेमा आले. या सिनेमांना प्रेक्षकांची मोठी पसंतीदेखील मिळाली आहे. काळानुसार मराठी सिनेसृष्टीने देखील कात टाकली. मराठी सिनेमांचे विषय, त्यांची धाडणी, सिनेमाची कथा यात अनेक प्रयोग होवू लागले आहेत. मात्र असं असंलं तरी आजही मराठी सिनेमांकडे फार कमी लोक वळताना दिसतं आहेत. शिवाय मराठी सिनेमांचा चित्रपटगृहांसाठी असलेला लढा कायम आहे.

गेल्या काही वर्षात अनेक मराठी सिनेमांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली छाप पाडली आहे. तसचं अनेक सिनेमांनी इतर नावाजलेल्या पुरस्कांवर आपलं नावं कोरलं आहे. यातच यंदाच्या वर्षीदेखील पुन्हा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी सिनेमांनी बाजी मारली आहे. यातील एक उल्लेखनीय सिनेमा म्हणजे ‘पिकासो’. गेल्या काही दिवसात ‘पिकासो’ सिनेमाची मोठी चर्चा रंगू लागली आहे. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारमध्ये ‘पिकासो’ला अन्य दोन चित्रपटांसह चित्रपटांच्या विशेष उल्लेखनीय श्रेणीत गौरवण्यात आलंय.

Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?
kamal nath
भाजपात जाण्याच्या चर्चांवर कमलनाथांची रोखठोक भूमिका, प्रसारमाध्यमांवर संताप व्यक्त करत म्हणाले…
Marathi Bhasha Din 2024 Wishes in Marathi
२७ फेब्रुवारी: मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या पत्रांमधून सर्वांपर्यंत पोहोचवा मायमराठीचा गोडवा, पाहा फोटो
Siddharth Chandekar wanted to become a chef
सिद्धार्थ चांदेकरला अभिनेता नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचे होते करिअर; म्हणाला, “आमच्या घरात…”

दशावतार या पारंपारिक कलाप्रकाराच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचं कथानक आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओक, बालकलाकार समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकादम हे प्रमुख भूमिकेत आहेत. याच सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांने ‘लोकसत्ता ऑनलाईन डिजिटल अड्डावर’ या कार्यक्रमात मनसोक्त गप्पा मारल्या. मराठीत गेल्या काही वर्षात दर्जेदार सिनेमा येत आहेत हे सांगतानाच त्याने मराठी सिनेमाला मिळणारा अल्प प्रतिसाद आणि चित्रपटगृहांचे शो याविषयी खंत व्यक्त केली.

मराठी माणसाने मराठी सिनेमांना प्राधान्य देणं गरजेचं

मराठी सिनेमांकडे कमी प्रेक्षक वळत आहेत यावर बोलताना प्रसाद म्हणाला, ” मराठी सिनेमा चालत नाही अशी ओरड करण्याआधी मराठी माणसानेच आधी विचार करण्याची गरज आहे  .मराठी माणसंचं हिंदीला आधी प्राधान्य देतात. जर महिन्यात तुम्ही एक चित्रपट पाहत असाल तर पहिला विचार मराठी चित्रपटाचा का होत नाही? मग मराठी सिनेमाल चित्रपटगृह मिळत नाही किंवा ते चालत नाही याचा आरडाओरड करण्याला अर्थ नाही. जर मराठीत चांगले सिनेमा बनत नाही अशी ओरड असेल तर ते खोटं आहे. गेल्या १०-१५ वर्षात अनेक मराठी उत्तम सिनेमा आले. यात ‘बालगंधर्व’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘टाईमपास’, ‘हिरकणी’, ‘फर्जंद’, ‘आनंदी गोपाळ’ अशा विविध धाटणीचे दर्जेदार चित्रपट मराठीत येत आहेत. त्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळतो.” असं तो म्हणाला.

मग त्यावेळेला साहित्यावरचं प्रेम कुठे जात
पुढे मराठी सिनेमा पाहताना प्रेक्षक साहित्याचा विचार करतात हे सांगताना प्रसाद म्हणाला, ” प्रत्येक मराठी सिनेमा उत्तम बनत नाही हे मी प्रमाणिकपणे नमूद करतो. मात्र हे हिंदीतही आहे. हिंदीतही प्रत्येक सिनेमा उत्तम बनत नाहीत. तिथेही वाईट सिनेमा असतात. मात्र त्यात मोठी स्टार कास्ट असते, ग्लॅमर असतं, पैसा खर्च केलेला असतो, परदेशात शूटिंग केलेलं असतं त्यामुळे लोकांना त्याच आकर्षण असतं म्हणून ते पाहायला जातात. मात्र त्यावेळेला तुमचं साहित्यावरचं प्रेम कुठे जातं? जयवंत दळवी, बालगंधर्वांवरचं प्रेम कुठे जात? कानेटकरांनरचं प्रेम कुठे जातं ?” असा सवाल प्रसादने उपस्थित केला आहे.

चित्रपटगृहांसाठी भिका मागव्या लागतात
मराठी सिनेमांसाठी चित्रपटगृहांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल प्रसाद म्हणाला, ” सगळ्यात आधी मराठी माणसाने विचार करायला हवा की आपण मराठी सिनेमांना प्राधान्य देतो का? आणि जर प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि राजकर्त्यांनीही याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक सिनेमासाठी निर्माते आणि दिग्दर्शकांना स्क्रीनसाठी भिका मागाव्या लागतात ही अत्यंत लाजिरवाणी आणि लांच्छनास्पद गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपट निर्मात्यांचा हक्कच आहे चित्रपटगृहांवर. त्यामुळे पहिलं प्राधान्य त्याला मिळालंच पाहिजे मग हिंदीला मिळालं पाहिजे आणि अशी मागणी जर निर्माते- दिग्दर्शकांची असेल तर त्यात काहीही गैर नाही. ” असं मत प्रसादने व्यक्त केलं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेमांना चित्रपटगृहात स्क्रीनसाठी भांडावं लागतं. अनेकदा अनेक पक्ष पाठिंबा देत आंदोलनं करतात. “मात्र आंदोलन का करावी लागतात? मराठीला स्क्रीन दिलीच गेली पाहिजे. असे निय़म असूनही चित्रपटगृह ते पायदळी तुडवतात. याकडे कोण का लक्ष घालत नाही?” असे प्रश्न यावेळी प्रसादने व्यक्त केले आहेत.

दरम्यान, या सिनेमात प्रसादने एखा शिल्पकाराची भूमिका साकारली आहे.  पांडुरंग गावडे असं त्याच्या भूमिकेच नाव आहे.