ग्रेटर हैद्राबाद महानगरपालिकेने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना दंड ठोठावला आहे. राम गोपाल वर्मा यांनी सरकारी भिंतींवर ‘पावर स्टार’ या आपल्या आगामी चित्रपटाची पोस्टर्स चिकटवली होती. या प्रकरणी महानगरपालिकेने कायदेशीर कारवाई करत त्यांना चक्क चार हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सरकारी मालमत्तांचा अनधिकृत वापर थांबावा यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

अवश्य पाहा – “सलमानच्या घरात तीन महिने राहिल्यानंतर…”; अभिनेत्याने उडवली जॅकलीनची खिल्ली

महानगरपालिकेच्या प्रवक्त्यांनी तेलंगणा टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणाची माहिती दिली. राम गोपाल वर्मा यांच्यावर अधिनियम ४०२, ४२१, ६७४, ५९६ आणि जीएचएमसी अधिनियम १९५५ व ४८७ अंतर्गत ही कारवाई केली गेली. त्यांना चार हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कोणालाही सरकारी नियमांच उल्लंघन करण्याचे अधिकार नाहीत. अगदी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकालाही नियमांचं पालन करावंच लागतं. याची जाणीव राम गोपाल वर्मा यांना व्हावी यासाठी ही कारवाई त्यांच्यावर केली गेली, असं मत महानगरपालिकेच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केलं.

अवश्य पाहा – करोनाची भीती; ‘या’ अभिनेत्रीच्या घरातच तयार केला मालिकेचा सेट

 

View this post on Instagram

 

A post shared by RGV (@rgvzoomin) on

‘पावर स्टार’ या आगामी चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण झळकणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. देशातील राजकारणावर भाष्य करणारा हा एक अॅक्शनपट आहे. सिनेमागृह बंद असल्यामुळे हा चित्रपट देखील OTT प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित होणार आहे.