बॉलिवूड म्हटलं की प्रत्येक चित्रपटात १ तरी गाणं असतं जे लोकप्रिय ठरतं. ते गाणं जेवढं लोकप्रिय तेवढीच मेहनत त्या कलाकारांनी त्या गाण्यासाठी घेतलेली असते. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मोहरा’ हा चित्रपट सगळ्यांच्या लक्षात आहे. मात्र, या चित्रपटा पेक्षा पावसाची पहिली सर आली की आठवतं ते म्हणजे त्यातल सुपरहिट गाणं ‘टिप टिप बरसा पाणी’. एका मुलाखतीत रवीनाना तिला या गाण्याचे चित्रीकरण करताना कोणत्या अडचणी आल्या होत्या ते सांगितले आहे.

रवीनाने ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत या सगळ्या अडचणींबद्दल सांगितले. हे गाणे एका कंस्ट्रक्शन साइटवर चार दिवस चित्रित करण्यात आलं. आजूबाजूला दगड आणि खिळे पडलेले होते आणि तिला अनवाणी या गाण्यासाठी चित्रीकरण करायचे होते. तिच्या गुडघ्यांना दुखापत झाली होती आणि आणखी वाईट गोष्ट म्हणजे तिला मासिक पाळी आली होती, असं रवीना म्हणाली.

आणखी वाचा : Video : जान्हवीने हातात चप्पल पकडून मित्र-मैत्रिणींसोबत केला डान्स

तर हे गाणं चित्रित करण्याआधी रवीनाला १०२ ताप देखील होता. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी कृत्रिम पाऊस करण्यात आला होता. त्यासाठी त्यांनी टॅंकर मागवले होते आणि ते पाणी थंड होतं. दरम्यान, १०२ ताप असून ही रवीनाला ४ दिवस गाण्याचे चित्रीकरण करावे लागले.

आणखी वाचा : नाइलाज म्हणून शर्टाला बांधली गाठ, चाहत्यांनी फॅशन समजून केली कॉपी

‘मोहरा’ चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. हे गाणं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलं आहे. तर, या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनमध्ये अक्षय आणि कतरिना कैफ दिसणार आहेत. ‘टिप टिप बरसा पाणी’चं रिमिक्स व्हर्जन हे त्यांचा आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’ मध्ये दिसणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे रोहित शेट्टीने केले आहे. तर, करोना व्हायरसमुळे हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी अपेक्षा प्रेक्षकांना लागली आहे.