अनोख्या गेम शोला लाभला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद

सुपरस्टार रितेश देशमुखला छोट्या पडद्यावर आणणा-या ‘विकता का उत्तर’ या अनोख्या गेम शोचं पहिलं पर्व या आठवड्यात निरोप घेणार आहे. स्टार प्रवाहवरील अनोख्या संकल्पनेवरील या गेम शोला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

आता थांबायचं नाय म्हणत स्टार प्रवाहनं मराठी माणसांच्या भाव करण्याच्या कलेला व्यासपीठ दिलं. हिंदी चित्रपटात स्वत:चा वेगळा ठसा उमटवलेल्या रितेश देशमुखनं या गेम शोमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. अभिनेता लेखक ह्रषिकेश जोशीनं त्याच्या ५२ बहुरंगी व्यक्तिरेखांतून धमाल केली. रितेशनं त्याच्या खास शैलीत पहिल्या एपिसोडपासूनच प्रत्येक स्पर्धकाशी संवाद साधला. या संवादातून महाराष्ट्रानं अनुभवले काही अविस्मरणीय क्षण आणि हा गेम शो महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला.

प्रत्येकाची स्वप्न साकार करण्याचं काम या गेम शोनं केलं. कित्येक स्पर्धकांच्या इच्छाआकांक्षा या गेम शो ने पूर्ण केल्या तर अनेकांना बक्षीसाच्या रक्कमेव्यतिरिक्त लाखमोलाच्या भेटी आठवणी  तसेच मदत मिळाली. काहींनी त्यांच्या आयुष्यातील भावनिक क्षणांना या गेम शोच्या मंचावर वाट मोकळी करून दिली. मराठी टेलिव्हिजनवरील गेम शोमध्ये विकता का उत्तरनं स्वत:चं वेगळेपण निर्माण केलं. त्यामुळे या गेम शोच्या दुसऱ्या पर्वाची महाराष्ट्र नक्कीच उत्सुकतेनं वाट पहाणार आहे.