05 March 2021

News Flash

घोड्याच्या मालकाने नाकारली सलमानची कोट्यावधी रुपयांची ऑफर

जाणून घ्या सविस्तर...

काही ऑफर अशा असतात ज्या नाकारल्या जाऊ शकत नाही. त्यात जर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने दिलेली ऑफर असेल तर क्वचितच कोणी नाकारेल. पण असेच काहीसे परमवीर या घोड्याच्या मालकाने केले आहे. सलमानला परमवीर हा घोडा प्रचंड आवडला होता. त्याने हा घोडा विकत घेण्याचे ठरवले होते. पण घोड्याच्या मालकाने तो विकण्यास नकार दिला आहे.

‘जागरण’ने दिलेल्या वृत्तानुसार, फरीदकोट येथे ‘हॉर्स ब्रीडर्स’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला सलमानने देखील हजेरी लावली होती. तेव्हा तेव्हा सलमानच्या टीमने परमवीरला पाहिले. त्यांना तो पाहता क्षणीच आवडला. सलमानच्या टीमने त्याच्या मालकाशी संपर्क साधला आणि परमीवरला विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. पण परमवीरच्या मालकाने सलमानला नकार दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

गेल्या वर्षी देखील परमवीरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. रिलायन्स ग्रूपने त्यासाठी १ कोटी रुपये देण्याचे ठरवले होते. यावर्षी सलमान खान देखील परमवीरला विकत घेण्यास अपयशी ठरला आहे. परमवीरचा दिवसाचा खर्च १८०० ते २ हजार रुपये आहे. यापूर्वी २०१८ मध्ये देखील सलमानला असाच एक घोडा आवडला होता. पण सलमानने दोन कोटी रुपये देऊनही घोड्याच्या मालकाने तो विकण्यास नकार दिला आहे. हा घोडा सुरत जवळ ओलपाड येथे राहणाऱ्या सिराज खान यांचा होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 5:01 pm

Web Title: salman khan offer rejected by a horse paramir owner avb 95
Next Stories
1 काय म्हणतेय प्रसाद ओकची बायको..पाहिलंत का?
2 मी भारती सिंह किंवा कपिल शर्मा नव्हे; नेहा पेंडसेचं ट्रोलर्सना उत्तर
3 मोनोकिनीमधील फोटो शेअर केल्यामुळे अंकिता झाली ट्रोल
Just Now!
X