News Flash

सलमानलाही करायचंय दीपिकासोबत काम

सलमान आणि दीपिका ही जोडी एकदाही पडद्यावर दिसली नाही.

दीपिका सध्या बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री आहे. ‘पद्मावत’, ‘पिकू’, ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ सारखे सुपरहिट चित्रपट दीपिकानं दिले आहेत. बॉलिवूडमधली सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणूनही ती ओळखली जाते. अशा या अभिनेत्रीसोबत काम करण्याची इच्छा एखाद्या कलाकाराला झाली नाही तर नवलच. बॉलिवूडचा भाईजान सलमाननंदेखील दीपिकासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सलमान आणि दीपिका ही जोडी एकदाही पडद्यावर दिसली नाही. दीपिकानं अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सैफ अली खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर, रणवीर सिंग यांसारख्या कलाकारांसोबत काम केलं. मात्र सलमानसोबत ऑनस्क्रीन तिची जोडी काही दिसली नाही. खुद्द सलमाननंही एका मुलाखतीत दीपिकासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

‘दीपिकासोबत कधी काम करायला मिळणार याची मी वाट पाहत आहे. दीपिका ही खूप मोठी कलाकार आहे तिच्यासोबत काम करायला मला आवडेल पण आतापर्यंत मला तिच्यासोबत काम करण्याची संधी मिळालीच नाही’ असंही सलमान खान म्हणला.

प्रियांका चोप्रानं ‘भारत’ चित्रपटाला नकार दिल्यानंतर या चित्रपटासाठी दीपिकाचं नाव चर्चेत होतं. मात्र त्याच काळात दीपिका अभिनेता रणवीर सिंगसोबत विवाहबंधनात अडकणार होती तिचं वेळापत्रक हे खूपच व्यग्र होतं म्हणून तिच्या नावाचा विचार केला गेला नाही असंही म्हटलं जात आहे. सध्या दीपिका ही छपाक् या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.  या चित्रपटाची निर्मिती स्वत: दीपिका करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 10:20 am

Web Title: salman khan on working with deepika padukone
Next Stories
1 ‘भाऊ आयुषमानसोबत माझी स्पर्धा नाहीच’
2 कोण हिट कोण फ्लॉप, तीन महिन्यांतील चित्रपटांची कमाई एका क्लिकवर
3 या अभिनेत्रीला करायचंय विकी कौशलला डेट
Just Now!
X