14 December 2019

News Flash

‘बिग बॉस १३’च्या सेटवर ऐश्वर्याचा उल्लेख होताच अशी होती सलमानची प्रतिक्रिया

सलमानने ऐश्वर्याचा उल्लेख करत स्पर्धकाला सल्लासुद्धा दिला...

सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन

मोठ्या पडद्यासोबतच छोट्या पडद्यावरही बॉलिवूडच्या ‘दबंग’ खान अर्थात सलमान खानचा जलवा कायम आहे. ‘बिग बॉस १३’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून सलमान प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. ‘वीकेंड का वार’ या भागात सलमान स्वत: बिग बॉसच्या स्पर्धकांशी संवाद साधत असतो. मात्र या आठवड्याच्या भागात असं काही घडलं की सलमानसुद्धा अवाक् झाला.

मजेशीर अंदाजात सलमान घरातील स्पर्धकांशी गप्पा मारत होता. यावेळी त्याने हिमांशी खुरानाला विचारले की, ”जर शहनाज ही पंजाबची कतरिना कैफ आहे तर मग हिमांशी कोण आहे?” सलमानच्या या प्रश्नावर हिमांशीने जे उत्तर दिलं ते ऐकल्यानंतर सलमानचा चेहरा पाहण्याजोगा झाला होता. ”लोक मला ऐश्वर्या राय म्हणतात”, असं हिमांशी म्हणाली. हे ऐकून काही सेकंद सलमान स्तब्ध होतो आणि म्हणतो, ‘वाह’! यानंतर सर्व स्पर्धकांमध्ये एकच हशा पिकतो. सलमानने पुढे म्हटलं, ”फक्त चेहरा मिळताजुळता असून नाही चालत, फिटनेसच्या बाबतीतही तसं राहावं लागतं. जसं कतरिना आणि ऐश्वर्याने स्वत:ला फिट ठेवलंय.”

‘बिग बॉस’च्या घरात शहनाज व हिमांशी या दोन स्पर्धकांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळतेय. या दोघीही पंजाबच्या असून गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात त्यांच्यामध्ये वादविवाद होत आहेत.

First Published on November 13, 2019 9:44 am

Web Title: salman khan stunned after aishwarya rai bachchan enters his show bigg boss 13 ssv 92
Just Now!
X