30 September 2020

News Flash

शाहरुख-गौरीची धम्माल होळी; पाहा व्हिडीओ…

... जेव्हा शाहरुख खान पत्नीला फेकतो पूलमध्ये

देशभरात आज होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून देशवासियांना होळीच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान बॉलिवूडचे शोमॅन सुभाष घई यांनी आपल्या अनोख्या अंदाजात होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी शाहरुख खानचा होळी खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

दिग्दर्शक सुभाष घई यांनी २० वर्षांपूर्वी आपल्या घरी होळी निमित्त एक खास पार्टी आयोजित केली होती. या होळी सेलिब्रेशनला अनेक नामांकित कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीत शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्या सेलिब्रेशनची आठवण सुभाष घई यांना यंदाच्या होळीच्या निमित्ताने आली. त्यांनी २००० सालचा हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

यापूर्वी आमिर खान, सलमान खान, ऋषी कपूर, करिना कपूर यांसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी होळी निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 6:07 pm

Web Title: shah rukh khan and gauri khan rage on holi in this throwback video from 2000 mppg 94
Next Stories
1 फराह खानच्या मुलीने पायाने खाल्ले बिस्किट, पाहा व्हिडीओ
2 “बोल्ड सीन्ससाठी फक्त अभिनेत्रींनाच का ट्रोल केलं जातं?”
3 अभिनेत्रीने घेतला पॉर्न वेबसाइट्सचा धसका; यापुढे करणार नाही ‘हे’ काम
Just Now!
X