News Flash

…म्हणून शाहरूख सध्या ‘महाभारत’ वाचतोय

'मागील एक-दीड वर्षापासून मी महाभारत वाचत आहे.'

shah rukh khan
शाहरूख खान

बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरूख सध्या महाभारताचे अध्ययन करत आहे. स्वत: शाहरूखने यासंदर्भात सोमवारी प्रसारमाध्यमांसमोर खुलासा केला. महाभारतावर चित्रपट बनवण्याची इच्छा त्याने याआधी व्यक्त केली होती. मुंबईतील ‘ताज लँड्स अँड’ हॉटेलमध्ये ईद साजरी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शाहरूख म्हणाला, ‘मागील एक-दीड वर्षापासून मी महाभारत वाचत आहे. त्यामध्ये वर्णन केलेली कथा मला आवडू लागली आहे. त्या कथा मी अबरामलासुद्धा रंजक पद्धतीने सांगतो.’ याआधी शाहरूखने मौर्य वंशज सम्राट अशोक यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल करू शकला नाही.

महाभारतावर चित्रपट बनवण्यावर शाहरूख यावेळी म्हणाला की, ‘महाभारतावर चित्रपट बनवण्याची माझी इच्छा आहे आणि कोणाच्याही मदतीशिवाय मी हा चित्रपट बनवू शकेन असं मला वाटत नाही. यासाठी मी काही निर्मात्यांशी बोलणार आहे. भारतीय निर्मात्यांकडून शक्य न झाल्यास मी आंतरराष्ट्रीय निर्मात्यांकडून या चित्रपटासाठी मदत घेण्याचा प्रयत्न करेन.’

VIDEO : कतरिना रणबीरला म्हणतेय ‘माझ्या डोळ्यात बघ’

धर्म हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असतो आणि आपल्या मुलांनासुद्धा धर्माबद्दल माहिती असावी असे मत शाहरूखने यावेळी व्यक्त केले. धर्माविषयी शाहरूख पुढे म्हणाला की, ‘माझ्या आई-वडिलांनी मला सर्व धर्मांचा आदर करण्यास शिकविले आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माविषयी माहिती असायला हवी. महाभारताप्रमाणेच मी इस्लामच्याही अनेक कथा अबरामला सांगत असतो. सर्व धर्मांबद्दल अबराम स्वत: जाणून घेईल आणि त्यांचे आदर करेल अशी मी अपेक्षा करतो.’

PHOTOS : सलमान खानची ग्रॅण्ड ईद पार्टी

आपल्या व्यस्त कामकाजातून शाहरूख आपल्या मुलांना वेळ द्यायला नेहमीच प्राधान्य देतो. सोशल मीडियावरही शाहरूख मुलांचे अनेकदा फोटो शेअर करतो. एक चांगल्या पित्याची जबाबदारी पूर्ण करण्याचा शाहरूख नेहमीच प्रयत्न करताना दिसतो. शाहरूखने बॉलिवूडमध्ये नुकतंच २५ वर्ष पूर्ण केले आहेत. २५ वर्ष चाहत्यांनी दिलेल्या भरभरून प्रेमासाठी शाहरूखने त्यांचे आभार मानले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2017 5:49 pm

Web Title: shah rukh khan is reading mahabharat from last one and half year
Next Stories
1 अबब! बॉलिवूड तारकेचा केवढा हा महागडा गाऊन
2 VIDEO : कतरिना रणबीरला म्हणतेय ‘माझ्या डोळ्यात बघ’
3 अभिनय क्षेत्रात नावारुपास येण्यापूर्वी ‘हे’ काम करत होती श्रद्धा
Just Now!
X