News Flash

संसाराविषयी शाहिदने प्रियांकाला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

या शोमध्ये त्याला करीना आणि प्रियांका या दोन एक्स गर्लफ्रेंड्ससोबतच्या कोणत्या आठवणी तू 'डिलीट' करू इच्छितोस असा प्रश्न विचारला गेला. त्यावर शाहिदने फार विचारपूर्वक उत्तर

शाहिद कपूर, प्रियांका चोप्रा

कोणी एकेकाळी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि शाहिद कपूर रिलेशनशिपमध्ये होते. हे दोघं २००९ साली आलेल्या ‘कमिने’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्यावेळी या दोघांच्याही प्रेमाच्या चर्चा खूपच रंगल्या होत्या. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. पण शाहिद-प्रियांका यांच्यामध्ये आजही चांगली मैत्री आहे. प्रियांकाच्या लग्नानंतर मुंबईत आयोजित रिसेप्शनमध्ये शाहिदने आवर्जून हजेरी लावली होती. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, प्रियांकाला संसाराविषयी एक मोलाचा सल्ला दिला आहे.

‘नो फिल्टर विथ नेहा’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा त्याला प्रियांका व निक जोनासला काय सल्ला देशील असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, ”एकमेकांबद्दल जितक्या चांगल्या पद्धतीने ओळखता येईल तितकं ओळखा, कारण तुम्हा दोघांची पार्श्वभूमी वेगळी आहे.” याआधीही ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये शाहिदला निकसाठी काय सल्ला देशील असं विचारलं होतं, तेव्हा तो म्हणाला, ”कधीच मागे वळू नकोस. तू खऱ्याखुऱ्या ‘देसी गर्ल’सोबत आहेस.” प्रियांका आणि निकसाठी शाहिदने नेहमीच शुभेच्छा दिल्या आहेत.

या शोमध्ये त्याला करीना आणि प्रियांका या दोन एक्स गर्लफ्रेंड्ससोबतच्या कोणत्या आठवणी तू ‘डिलीट’ करू इच्छितोस असा प्रश्न विचारला गेला. त्यावर शाहिदने फार विचारपूर्वक उत्तर दिलं होतं. ”करीनासोबत माझं नातं प्रियांकापेक्षा फार जास्त काळ होतं. मला असं वाटतं त्या दोघींसोबत असताना मी जे काही शिकलो त्यामुळेच आज मी असा व्यक्ती होऊ शकलो. त्यामुळे मला कोणत्याच आठवणी पुसायच्या नाही आहेत. कारण त्यातून मला खूप काही शिकायला मिळालं,” असं त्याने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 4:42 pm

Web Title: shahid kapoor give this advice to priyanka chopra and nick jonas ssv 92
Next Stories
1 ‘हाऊसफुल ४’ने पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी रुपये
2 ‘अग्गंबाई सासूबाई’मधील आजोबांविषयी या रंजक गोष्टी माहितीयेत का?
3 ‘कलर्स मराठी अवॉर्ड’मध्ये ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेने मारली बाजी
Just Now!
X