News Flash

मुलाचं नाव AbRam का ठेवलं?; शाहरुख खानने केला खुलासा

शाहरुखने एका मुलाखतीत केला खुलासा..

बॉलिवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खान ओळखला जातो. शाहरूखचे लाखो चाहते आहेत. त्यात शाहरूखचा धाकटा मुलगा अबरामचे चाहते हे शाहरुख पेक्षा कमी नाहीत. आपला आवडता कलाकार आणि त्याच्या कुटुंबाच्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा ही चाहत्यांची असते. शाहरुख त्याच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी या मोकळेपणाने सांगतो. दरम्यान, अनेकांना प्रश्न आहे की शाहरुखने धाकट्या मुलाचे नाव (AbRam) अबराम का ठेवले?  त्याचे उत्तर शाहरुखने एका मुलाखतीत दिले आहे. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

शाहरुखचा एक थ्रोबॅक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखने याचा खुलासा केला आहे. “आमचे पहिले प्रेषित हजरत इब्राहिम होते. तर त्याचे नाव त्यांच्यावर आधारित आहे. माझं कुटुंब हे हिंदू-मुस्लिम आहे. त्यामुळे मला माझ्यामुलांनी एखाद्या नावाच्या अर्थावर मोठे होऊ नये अशी माझी इच्छा होती. तर अबरामच्या नावात हिंदू देव राम यांचे नाव आहे आणि ते छान वाटते, असं शाहरुख म्हणाला.

 

दरम्यान, शाहरुख अबरामचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. अबरामचा जन्म सरोगसीद्वारे २०१३ मध्ये झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 7:52 pm

Web Title: shahrukh khan revealed why he named his son abram dcp 98
Next Stories
1 “मी देवीला प्रार्थना केली होती की मला प्रत्येक हिंदू मंदिराचा आवाज बनव”- अनुराधा पौडवाल
2 ‘राधे’च्या ‘सिटी मार’साठी सलमान अल्लु अर्जुनला म्हणाला Thank You..!
3 ‘मिस्टर इंडिया’, ‘राम लखन’ फिल्मचे एडिटर वामन भोसले यांचे निधन
Just Now!
X