26 February 2021

News Flash

शाहरुखचा मुलगाही ठरतोय किंग; त्याचे फोटो पाहिलेत का?

आयपीएल लिलावातले आर्यनचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल

काल आयपीएलचे लिलाव पार पडले. कोणता खेळाडू कोणाकडे गेला याची तर चर्चा होतीच. पण यंदा सगळी हवा एकाचीच सुरु होती. तो म्हणजे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान. आर्यनच्या उपस्थितीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

सध्या सोशल मिडियावर आर्यनचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री जुही चावलाने आपली मुलगी जान्हवी आणि आर्यन एकत्र बसलेले असतानाचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यात आर्यन अगदी आपले वडील शाहरुख खानसारखा दिसत आहे. तसंच या कार्यक्रमातले आर्यनचे व्हिडिओजही व्हायरल होतायत. केस नीट करण्याची आर्यनची पद्धत, कॉफी मग उचलण्याची पद्धत अगदी शाहरुख खानची आठवण करुन देत आहेत. काही चाहत्यांनी तर “आमचा नवा शाहरुख” अशाही कमेंट्स केल्या आहेत. आर्यन शाहरुख खानची कार्बन क़ॉपी असल्याचंही काही चाहत्यांनी म्हटलं आहे. आर्यन बॉलीवूडमध्ये येईल की नाही माहित नाही पण त्याआधीच त्याचं फॅन फॉलोईंग वेगानं वाढताना दिसतंय. आर्यनच्या नावानं सोशल मिडियावर अनेक फॅनपेजेसही आहेत. आत्तापासूनच आर्यनला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळतंय.

शाहरुख आणि आर्यन यांनी लायन किंग या चित्रपटातल्या एका पात्राला आवाज दिला होता. तेव्हापासूनच आर्यन प्रेक्षकांमध्ये आणि शाहरुखच्या चाहत्यांमध्येही चर्चेचा विषय़ ठरतोय. आता त्यांचं लक्ष आर्यनच्या बॉलिवूड एन्ट्रीकडे लागलेलं आहे.

शाहरुखला तीन मुलं आहेत, आर्यन, सुहाना आणि सगळ्यात लहान अबराम. या लिलावात अभिनेत्री जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहताही दिसली. आत्तापर्यंत जान्हवी माध्यमांपासून दूरच होती. काल मात्र पहिल्यांदाच ती लाईमलाईटमध्ये आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2021 6:03 pm

Web Title: shahrukh khans son aryan khan gaining popularity vk98
Next Stories
1 साराने शेअर केला ‘मिस्ट्री मॅन’चा फोटो, म्हणाली ओळखा पाहू…
2 बाप-लेकीची जोडी! कपिल शर्माच्या मुलीला पाहिलेत का?
3 शाहिद कपूरचे डिजिटल विश्वात पदार्पण
Just Now!
X