छोट्या पडद्यावरील काही मालिका अशा आहेत ज्या आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्या मालिकांचे दुसरे पर्वही चाहते आवडीने पाहतात. काही दिवसांपूर्वी ‘कसौटी जिंदगी की २’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. तसेच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीलाही उतरत असल्याचे पाहायला मिळाले. आता मालिकेत मिस्टर बाजाच्या भूमिकेत अभिनेता शरद केळकर दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.
नुकताच शरदने या संदर्भात ‘आज तक’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने बजाजच्या भूमिकेसाठी फोन आल्याचे सांगितले. पण त्याने या भूमिकेसाठी होकार दिलेला नाही. ‘मी या भूमिके विषयी अजून विचार केलेला नाही. तसेच मालिकेच चित्रीकरण केव्हा सुरु होण्याची हे देखील माहिती नाही. सध्या करोनामुळे मी कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही. माझी खूप कामे बाकी आहेत. ती सुद्धा मी पूर्ण केलेली नाहीत. पहिले भूज चित्रपट पूर्ण होऊ दे, मग लक्ष्मी बॉम्ब पूर्ण होऊ देत. खूप कामे बाकी असल्यामुळे मी विचार केलेला नाही’ असे त्याने म्हटले आहे.
‘खरे सांगचे झाले तर मी कसौटी ही पहिली मालिका पाहिलेली नाही. त्यावेळी ती मालिका पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर होती पण त्यावेळी देखील मी कामात व्यग्र होतो त्यामुळे मला ती पाहता आली नाही. पहिले करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती ठिक होऊ दे मग विचार करेन काय करायचे आणि काय नाही. तसेच आता यावर विचार करुन काही फायदा नाही’ असे शरद पुढे म्हणाला.