News Flash

शत्रूघ्न सिन्हा रुग्णालयात

बॉलीवूड अभिनेता आणि भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांना नियमित तपासणीसाठी अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

| May 24, 2014 04:16 am

बॉलीवूड अभिनेता आणि भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांना नियमित तपासणीसाठी अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शत्रूघ्न सिन्हा यांच्यावर गेल्यावर्षी ह्दयविकाराशी संबंधित बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
या शस्त्रक्रियेनंतरच्या नियमित तपासणीसाठी शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्यावर्षी जुलै महिन्यात घरात काम करत असताना, अचानक शत्रूघ्न सिन्हा यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना लगेचच कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी चाचण्यांमध्ये त्यांच्या ह्दयवाहिन्यांत अडथळे दिसून आल्यानंतर डॉक्टरांनी लगेचच त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया केली होती. शत्रूघ्न सिन्हा यांनी गेल्याच आठवडयात बिहारमधील पाटणासाहिब मधून लोकसभेची निवडणूक जिंकली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 4:16 am

Web Title: shatrughan sinha admitted to mumbai hospital for check up
Next Stories
1 प्रशांत दामले यांचा नाटकांना अर्धविराम
2 पाहाः कान २०१४ मधील आपल्या लूकबाबत काय म्हणतेय ऐश्वर्या
3 मोदींच्या शपथविधीला सलमान, अमिताभ आणि रजनीकांत यांना आमंत्रण
Just Now!
X