‘जॉबलेस’ या सीरिजच्या शूटिंगचा श्रीगणेशा नुकताच पुण्यात झाला. ‘जॉबलेस’ नावाची ही वेबसीरिज आहे. या सीरिजची पटकथा सस्पेंस क्राईम थ्रिलरने भरपूर आहे. ‘जॉबलेस’ची कथा ही एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसाची आहे, जो एका छोट्याशा नजरचुकीनं गुन्हेगारीच्या चक्रव्युहात अडकत जातो.
जॉबलेसमध्ये गुन्हेगारी दाखवण्यात येत असली तरी याची पटकथा ही अंडरवर्ल्डची नाही आहे. या सीरिजमध्ये जे घडणार आहे ते मराठी प्रेक्षकांनी या आधी क्वचितच कुठल्या चित्रपटात किंवा सीरिजमध्ये पाहिलं असेल.
या वेबसिरीजविषयी प्लॅनेट मराठीचे निर्माते अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”जॉबलेसचा विषय हा क्राईम थ्रिलर जॉनरचा आहे, एक चुकीचा निर्णय आपल्या आयुष्यात कसा बदल करू शकतो, अशी काहीशी या सीरिजची पटकथा आहे. ही सीरिज प्रेक्षकांना एका जबरदस्त क्राईम थ्रिलरचा नक्कीच अनुभव देईल. ही सीरीज प्रेक्षकांना नक्कीच शेवटपर्यंत बांधून ठेवू शकेल, एवढं मी नक्कीच सांगू शकतो”.
View this post on Instagram
जॉबलेसमध्ये सुव्रत मुख्य भुमिकेत दिसणार आहे. सुव्रत बरोबर हरीश दुधाडे, पुष्कर श्रोत्री, मयुरी वाघ, स्वप्नाली पाटील, राधा धरणे हे कलाकाराही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही सीरिज सात भागांची असून याचे दिग्दर्शन निरंजन पत्की यांनी केलंय. ही वेबसिरीज लवकरच प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.