News Flash

‘या’ ठिकाणी हनिमूनला गेली सोनम कपूर?

आता सोनमला थोडा मोकळा वेळ मिळाला असून सोनम आणि आनंद त्यांच्या हनिमूनला गेले आहेत.

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचे प्रियकर आनंद अहुजाशी ८ मे रोजी लग्न झाले. लग्नानंतर सोनम लगेच कान चित्रपट महोत्सवात गेली होती. महोत्सवातून परतल्यावर ती लगेच आगामी सिनेमा ‘वीरे दी वेडिंग’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र होती. पण आता सोनमला थोडा मोकळा वेळ मिळाला असून सोनम आणि आनंद त्यांच्या हनिमूनला गेले आहेत. सोनमने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ग्रीसमध्ये असल्याचे कळून येते. एका ब्रॅण्डने सोनमला भेटवस्तू दिली. या ब्रॅण्डचे आभार सोनमने इन्स्टा स्टोरीमध्ये मानले आहेत. आभार मानतानाच तिने सांगितले की ती आनंद अहुजासोबत ग्रीसमध्ये आहे.

सोनम कपूर स्टारर ‘वीरे दी वेडिंग’ सिनेमा येत्या १ जूनला प्रदर्शित होणार आहे. सिनेमात सोनमसोबत करिना कपूर- खान, स्वरा भास्कर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमाच्या प्रदर्शनानंतर सोनम लगेच ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. या सिनेमातून पहिल्यांदा अनिल कपूर आणि सोनम एकत्र काम करणार आहेत.

सोनमने मुंबईतील वांद्रे येथील कविता सिंह या आपल्या मावशीच्या आलिशान हेरिटेज हवेलीमध्ये लग्न केले. या लग्नाला बॉलिवूडचे अनेक तारे- तारकांनी उपस्थिती लावली होती. लग्नानंतर दोघांनी मुंबईतील पंचतारांकीत हॉटेल द लीलामध्ये जंगी रिसेप्शनही ठेवले होते. या पार्टीमध्ये सलमान खान, शाहरुख खान, वरुण धवन, सैफ अली खान, करिना कपूर- खान, कतरिना कैफ यांसारख्या अनेद दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 4:19 pm

Web Title: sonam kapoor is celebrating honeymoon with anand ahuja in greece see video
Next Stories
1 अभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न?
2 …म्हणून शाहरुखकडून १० लाख रुपये घेण्यास बिग बींचा नकार
3 ऋषी कपूर यांचं ट्विट रणबीर- आलियाच्या नात्यासंबंधी तर नाहीये ना?
Just Now!
X