26 February 2021

News Flash

‘झिरो’मधील श्रीदेवींचं गाणं पाहण्यासाठी प्रेक्षकांना करावी लागणार आणखी प्रतीक्षा

झिरो चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होत्या.

शाहरूख खान, कतरिना कैफ, अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘झिरो’ चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होत्या. त्यांची भूमिका असलेलं गाणं हे पूर्वीच चित्रीत करण्यात आलं होतं, जे ‘झिरो’मध्ये दाखवण्यात येणार असून चित्रपट प्रदर्शनापूर्वी ते प्रदर्शित करायचं नाही असा निर्णय शाहरूखनं घेतला आहे.

श्रीदेवी यांच्यासोबत गाण्यात इतरही अभिनेत्री दिसणार आहेत. त्यामुळे श्रीदेवी यांची भूमिका असलेलं हे शेवटचं गाणं पाहण्यासाठी चाहत्यांनी चित्रपटातगृहात यावं अशी शाहरुखची इच्छा आहे .म्हणूनच हे गाणं चित्रपट प्रदर्शनापूर्वी बाहेर न आणण्याचा प्रयत्न शाहरुख आणि ‘झिरो’ची संपूर्ण टीम करत आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये श्रीदेवी यांचा दुबईत अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे श्रीदेवी यांचा कॅमिओ रोल असणारा हा त्यांचा शेवटचा चित्रपट असणार आहे. या गाण्यात करिश्मा आणि आलिया भट्टदेखील असतील असं म्हटलं जात आहे. २१ डिसेंबर २०१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 3:40 pm

Web Title: sridevi special song wont be out before the film release shah rukh khan
Next Stories
1 बॉक्स ऑफीसवर नागराज मंजुळेच्या ‘नाळ’ची गाडी सुसाट
2 The Kapil Sharma Show Teaser : पोट धरून हसवायला ‘कॉमेडीचा बादशहा’ परत आलाय!
3 ”तुला पाहते रे’ महाराष्ट्रासाठी घातक, मालिका बंद करा’
Just Now!
X