News Flash

Corona Crisis: व्यथित सुहाना खानला भेटायला गौरी आणि आर्यन न्यू यॉर्कला रवाना

जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चे असते. सुहानाने करोनाचे वाढते संक्रमण पाहता सोशल मीडियावर पोस्ट करत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आई गौरी खान आणि भाऊ आर्यन खान हे न्यू यॉर्कला निघाले आहेत.

सुहानाने इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे. सुहानाने एप्रिल २०२१ मध्ये करोनाची वाढती संख्या दाखवणाऱ्या एका ग्राफचा फोटो शेअर केला आहे. सोबतच ‘करोनाचा स्त्रोत आणि सुरक्षित रहा’ असे कॅप्शन देखील सुहानाने दिले आहे.

सुहानाच्या या पोस्टनंतर गौरी खान आणि आर्यन खान हे दोघे मुंबई विमानतळावर दिसले होते. न्यू यॉर्कला सुहानासोबत राहण्यासाठी जातं असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी गौरीने प्रिंटेड ड्रेस आणि कोट परिधान केलं होतं. तर, आर्यनने काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि डेनिम जॅकेट परिधान केलं होतं. त्यादोघांनी ही मास्क परिधान केला असून करोनाच्या सगळ्या निर्बंधांचे पालण त्यांनी केले होते.

सुहाना सध्या न्यू यॉर्क मध्ये आहे. तिथेच ती फिल्ममेकिंगचे धडे घेत आहे. सुहानाने ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लु’ या शॉर्ट फिल्ममध्ये भूमिका साकारली होती. सुहानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसेल तरी तिचे लाखो चाहते आहेत.

दरम्यान, शाहरूख अजूनही मुंबईत आहे. शाहरूख ‘पठाण’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात शाहरूख सोबत दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 11:51 am

Web Title: suhana khan expresses concern over growing covid 19 cases gauri khan aryan khan fly to new york to meet her dcp 98
Next Stories
1 नदीम-श्रवण जोडीतले श्रवण यांचं निधन; या मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
2 “असं वापरा मास्क”, माधुरी दीक्षित देतेय मास्क वापरण्याचे धडे
3 जेव्हा वडिलांना पत्र लिहून अभिनेता होण्याची इच्छा व्यक्त केली; मनोज वाजपेयीचा ‘तो’ अनुभव
Just Now!
X